आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग 3' ने पहिल्या विकेण्डला केली 81.15 कोटींची कमाई, सीएएच्या निषेधामुळे 12 कोटींचे नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः सलमान खान आणि कीचा सुदीप स्टारर 'दबंग 3' ने तीन दिवसांत 81.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी 24.50 कोटी आणि दुसर्‍या दिवशी 24.75 कोटी कमावल्यानंतर या चित्रपटाने तिसर्‍या दिवशी 31.90 कोटींचा व्यवसाय केला. तथापि, देशभरातील नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) आणि एनआरसीच्या विरोधामुळे या चित्रपटाचे नुकसान झाले आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शच्या ट्विटनुसार, पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला जवळपास 12 कोटींचा तोटा झाला आहे.

  • वर्षाचा पाचवा सर्वात मोठा वीकेण्ड ओपनर

यंदाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 'दबंग 3' या वर्षाचा 5 वा सर्वात मोठा वीकेण्ड ओपनर ठरला आहे.  या यादीत हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट आघाडीवर असून या चित्रपटाने ओपनिंग विकेण्डला 166.25 कोटींची कमाई केली.

रँकचित्रपटरिलीज डेटपहिल्या दिवसाची कमाई पहिल्या विकेण्डची कमाई 
1वॉर02 Oct 201953.35 कोटी रुपये166.25 कोटी रुपये
2एवेंजर्स : एंडगेम (हॉलिवूड) 26 Apr 201953.10 कोटी रुपये157.2 कोटी रुपये
3भारत05 Jun 201942.30 कोटी रुपये 150.10 कोटी रुपये
4मिशन मंगल15 Aug 201929.16 कोटी रुपये97.56 कोटी रुपये
5दबंग 330 Aug 201924.40 कोटी रुपये81.15 कोटी रुपये