आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office : Prabhas Shraddha Kapoor Starrer 'Saaho' Becomes The Third Largest Opener Film Of 2019 In Hindi

बॉक्स ऑफिस : हिंदीमध्ये 2019 चा तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला प्रभास-श्रद्धा कपूर स्टारर 'साहो'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट नरेंद्र गुप्तानुसार, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी सुमारे 24 कोटी रुपये कमवले. दैनिक भास्करसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदी बेल्टमध्ये खूप चांगली ओपनिंग आहे. मात्र उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये प्रिंट उशिरा पोहोचल्यामुळे हा चित्रपट आज (शनिवारी) रिलीज झाला. 
 

देशभरात 45 कोटी रुपये कमवले... 
नरेंद्र गुप्ताने सांगितल्याप्रमाणे, "देशभरात चित्रपटातचे कलेक्शन सुमारे 45 कोटी रुपये झाले. ज्याला जबरदस्त सुरुवात म्हणू शकतो. शनिवारपासून याच्या कमाई मध्ये घसरण नक्कीच येईल. कारण माउथ पब्लिसिटी खूप खराब आहे. चित्रपटात असा कोणताच एलिमेंट नाहीये जो लोकांना आकर्षित करू शकेल." 
 

2019 चा तिसरा सर्वात मोठा ओपनर... 
हिंदी बेल्टमध्ये 'साहो' 2019 चा तापर्यँतचा तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर सलमानचा 'भारत' आहे, ज्याने 42 कोटींच्या कलेक्शनसोबत आपली ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आहे. ज्याने पहिल्या दिवशी 29.16 कोटी रुपये कमवले होते. 
 

टॉप 5 हिंदी चित्रपट... 

क्रमांकचित्रपट ओपनिंग डे कलेक्शन
1भारत    42 कोटी रुपये 
2मिशन मंगल29.16 कोटी रुपये 
3साहो         24 कोटी रुपये 
4कलंक    21.60 कोटी रुपये 
5केसरी    21.06 कोटी रुपये 

 

बातम्या आणखी आहेत...