आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office : 'Super 30' Earned Rs 11.83 Crore On Its Opening Day, Hrithik's Fourth Biggest Opener Film

बॉक्स ऑफिस : 'सुपर 30' ने पहिल्याच दिवशी कमवले 11.83 कोटी रुपये, ऋतिकचा चौथा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन स्टारर 'सुपर 30' ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. ट्रेड अनालिस्ट तरन आदर्शच्या ट्वीटनुसार, विकास बहलच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 11.83 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.  

 

सुपर 30 ऋतिकच्या करियरमधील चौथा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.  
ऋतिकचे टॉप 5 चित्रपट आणि त्यांची पहिल्या दिवसाची कमाई...  

1    बँग बँग (2014)    27.54 कोटी रुपये  
2    क्रिश 3 (2013)    25 कोटी रुपये
3    अग्निपथ (2012)    23 कोटी रुपये
4    सुपर 30  (2019)    11.83 कोटी रुपये
5    काबिल (2017)    10.43 कोटी रुपये

 

2019 मध्ये पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 8 व्या क्रमांकावर आहे.

 

2019 चे टॉप 10 चित्रपट आणि त्यांची पहिल्या दिवसांची कमाई. 
1    भारत    42.30 कोटी रुपये
2    कलंक     21.60 कोटी रुपये
3    केसरी    21.06 कोटी रुपये
4    कबीर सिंह     20.21 कोटी रुपये
5    गली बॉय     19.40 कोटी रुपये
6    टोटल धमाल     16.50 कोटी रुपये
7    स्टुडंट ऑफ द ईयर 2    12.06 कोटी रुपये
8    सुपर 30      11.83 कोटी रुपये
9    दे दे प्यार दे    10.41 कोटी रुपये
10    मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी    8.75 कोटी रुपये

 

बिहारमध्ये गरीब मुलांना विनाशुल्क कोचिंग क्लासेस घेणारे गणित तज्ञ आनंद कुमारच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'सुपर 30' मध्ये ऋतिकसोबत मृणाल ठाकुर, पंकज त्रिपाठी, वीरेंद्र सक्सेना, नंदीश संधू, जॉनी लीवर आणि अमित साध हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत.