आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सर मॅरी कॉमने प्रेसिडेंट्स कपमध्ये जिंकले सुवर्ण, ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्धीला 5-0 ने मात दिली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- बॉक्सर एमसी मॅरीकॉमने 23 व्या प्रेसिडेंट्स कपच्या 51 किलो ग्राम स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. आज(रविवार) इंडोनेशियाच्या लाबुआन बाजोमध्ये झालेल्या फायनलमध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँक्सला 5-0 ने मात दिली. सहा वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन मॅरीकॉमने या वर्षी मे महिन्यात इंडिया ओपन बॉक्सिंग टूर्नामेंटमध्येही सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने भाग घेतला नव्हता. पण प्रेसिंडेट कपमध्ये ऑलिंपिकच्या तयारीसाठी तिने भाग घेतला.


वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 7 सप्टेंबर पासून 21 पर्यंत रशियात होणार आहे. मॅरीकॉमचे लक्ष 2020 टोक्यो ऑलिंपिकमध्ये क्वॉलिफाय करण्यावर असेल. मॅरीकॉमने 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये कास्य पदक जिंकले होते. तसेच एशियन गेम्समध्ये तिच्या नावावर एक सुवर्ण आणि एक कास्य पदक आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने एक सुवर्ण पदक जिंकले आहे.


हे पदक माझ्या आणि देशासाठी आहे
मॅरीकॉमने ट्वीट केले की, "प्रेसिडेंट्स कपमध्ये जिंकलेले पदक माझ्या आणि देशासाठी आहे. जिंकण्याचा अर्थ आहे की, तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहात. तुम्ही कठोर परिश्रम करता. दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त प्रयत्न करता. मी कोच, स्टाफ आणि किरण रिजीजू यांना धन्यवाद देते."

 

बातम्या आणखी आहेत...