वर्ल्ड चॅम्पियनशिप / बाॅक्सिंग : विश्वविक्रमापासून मेरी काेम अवघ्या पावलावर

प्री-क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या जुतामास जितपाेंगचा पराभव केला

वृत्तसंस्था

Oct 09,2019 11:46:00 AM IST

मॉस्को - सहा वेळची विश्वविजेती बाॅक्सर मेरी काेम आता विश्वविक्रमापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिने जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने ५१ किलाे वजन गटात हा पराक्रम गाजवला. तिने या नव्या वजन गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या जुतामास जितपाेंगचा पराभव केला. तिने ५-० ने हा सामना जिंकला. आता भारताच्या मेरी काेमचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना रिआे आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इनग्रिट व्हेलेन्सियाशी हाेणार आहे. काेलंबियाच्या या बाॅक्सरने २०१६ च्या आॅलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली हाेती.


भारताच्या मेरी काेमला आता या उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह विश्वविक्रमी पदक आपल्या नावे करण्याची संधी आहे. तिचे जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेतील हे विक्रमी आठवे पदक ठरणार आहे. अशा प्रकारे या स्पर्धेत आठ पदके जिंकणारी मेरी काेमही जगातील पहिलीच बाॅक्सर ठरणार आहे. आतापर्यंत असा पराक्रम काेणीही गाजवलेला नाही.

X
COMMENT