आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात बांगड्या आणि मंगळसुत्र परिधान करून TikTok व्हिडिओ बनवत होता मुलगा, पण नंतर जे घडले त्यामुळे कुटुंबीय झाले शॉक्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा (राजस्थान) - राजस्थानच्या कोटा घडलेल्या एक घटनेमुळे सर्वांनाच हैराण केले आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. कोटाच्या विज्ञान नगर भागात ही घटना घडली. पोलिसांच्या मते, घटनेवेळी या मुलाने हातात बांगड्या आणि मंगळसुत्र घातलेले होते. पोलिसांच्या मते मुलगा टिकटॉक व्हिडिओ करण्याच्या तयारीत असावा. 

 

गळ्यात लोखंडाची साखळी गुंडाळलेली होती
पोलिसांच्या मते, मुलगा सोमवारी रात्री झोपण्यासाठी खोलीत गेला होता. पण दुसऱ्या दिवशी बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यात लोखंडाची साखळी गुंडाळलेली होती. कुटुंबीयांनी त्याला पाहताच रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 


स्वतः चुकीने मुलाने गमावले प्राण
एसएचओ मुमिंद्र सिंहने सांगितले की, 'स्वतः चुकीने मुलाला प्राण गमवावे लागल्याचे प्रथम चाचणीत समोर येते. तो टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या तयारीत होता.' शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे ते म्हणाले. 


रात्रभर खेळत होता व्हिडिओ गेम
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्याला मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळण्याचा नाद होता आणि टिकटॉक अॅप देखील डाउनलोड केले होते. एसएचओनी सांगितले की, पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. कोटाचे एएसपी राजेश मिल यांनी सांगितले की, मुलाच्या वडिलांनुसार तो सोमवारी रात्रभर मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळत होता. व्हिडिओ गेम किंवा एखाद्या मोबाइल अॅपमुळे त्याचा मृत्यू झाला हे सांगणे थोडे कठीण आहे.