आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाच्या शरीरावर जन्मतःच होते काळे डाग, डॉक्टरांना पाहताच कळाला होता हा धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटलांटा. अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये जवळपास पाच वर्षांपुर्वी एका बाळाच जन्म झाला. ज्याच्या अंगावर काळे चट्टे होते. डॉक्टरांना त्याला पाहूनच धोका कळाला होता. बाळाला कॉन्जेनिटल मेलानोसाइटिक नेवस नावाचा गंभीर आजार होता. यामध्ये भविष्यात कँसरचाही धोका असतो. डॉक्टरांनी कुटूंबाला मुलाच्या कंडीशनविषयी अलर्ट केले आणि भविष्यात होणा-या सर्जरीविषयी सांगितले. आतापर्यंत बाळाचे 26 ऑपरेशन झाले आहेत. परंतू काळे चट्टे पुर्णपणे गेलेले नाहीत. 


डॉक्टरांनी पालकांना केले अलर्ट 

- हे प्रकरण जॉर्जिया स्टेटच्या अटलांटा सिटीमधील आहे. येथे पाचवर्षांपुर्वी डिलानचा जन्म चर्चेचा विषय ठरला. त्याच्या शरीरावर जन्मतःच काळे चट्टे होते. यामुळे त्याची पुर्ण पाठ काळी होती. 
- जन्म होताच डॉक्टरांना त्याच्या स्थितीचा अंदाजा आला होता. बाळाला कॉन्जेनिटल मेलानोसाइटक नेवस नावाचा आजार होता. यामध्ये स्किन कँसर होण्याची रिस्क खुप जास्त असते.
- डॉक्टरांनी डिलानच्या आईला पहिलेच अलर्ट केले होते की, बाळाला जन्माच्या पहिल्या वर्षात अनेक सर्जरीचा सामना करावा लागेल. 
- डिलानची पाठ डागांमुळे संपुर्ण काळी होती. डॉक्टरांना हे डाग पुर्णपणे काढायचे आहेत. यासाठी एका लहान मुलाच्या त्वेचेची गरज होती. परंतु एखाद्या बाळाची ऐवढी स्किन मिळणेही शक्य नव्हते.

 

5 वर्षात झाले 26 ऑपरेशन 
- डिलान थोडा मोठा झाल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. हे ऑपरेशन खुप अवघड होते, कारण यामध्ये खुप जास्त स्किन ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. अशा वेळी डॉक्टरांनी त्याच्या बॉडीवर काही स्किन इम्प्लांट केली.
- यानंतर इम्प्लांटवरुन स्किन काढून डॉक्टरांनी त्याच्या बॉडीच्या प्रभावित भागांवर ट्रान्सप्लांट करणे सुरु केले. वयाच्या 5 वर्षांपर्यंत त्याचे 26 ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये त्याच्या शरीरातून फक्त अर्धे डाग दूर झाले.
 
हे डाग आता परत कधीच येऊ नयेत
- डिलानच्या आईने सांगितले की, हे बर्थमार्क पुन्हा कधीच येऊ नये. कारण हे कँसरचे रुप घेऊ शकतात. 
- काराने सांगितले की, माझ्या मुलाची प्रत्येक तीन ते सहा महिन्यांमध्ये सर्जरी करावी लागते. सर्जरीची वेळ ही शरीराच्या कोणत्या ठिकाणी सर्जरी होणार यावर अवलंबुन असते. 
- कारा म्हणते की, नेहमीच डिलानवर सर्जरी होत असली तरीही तो खुप आनंदी राहतो. त्याला दिर्घ आणि चांगले आयुष्य मिळावे याचा आम्हीही प्रयत्न करत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...