आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन कार पेटवून दिलेल्या आशिष पंडित लुटे (२०, रा. अरिहंतनगर) व एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. २६ फेब्रुवारी रोजी विष्णुनगरातील अरिहंतनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली हाेती. कॉलनीतील लोक आपल्याविषयी कुटुंबाला काहीही माहिती सांगतात, बाहेर करत असलेल्या कारनाम्यांविषयी माहिती देतात, असा संशय घेत रागातून दोघांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
अरिहंतनगरातील व्यापारी रूपेश वडगावकर यांची नवीन मारुती वॅगन आर कार (एमएच २० ईजे ७३८२) व कदम यांची कार (एमएच २० ईजे ९९६०) २६ फेब्रुवारी रोजी रात्री अडीचच्या सुमारास पेटवून देण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना त्यांना हा प्रकार लुटे व त्याच्या मित्राने केल्याचे समोर आले. ते दोघेही आकाशवाणी चौकात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कार जाळल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, हवालदार संतोष सोनवणे, बापूराव बावस्कर, लाला पठाण, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, बहुरे यांनी कारवाई केली.
आशिष हा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतो. त्याचे वडील सेवानिवृत्त आहेत. तर अल्पवयीन आरोपी अकरावीत आहे. त्याचे वडील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.