आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षाच्या मुलाने कुराण आणि बायबलचा अनुवाद करून तयार केले इंजेक्शन, ते शरीरात इंजेक्टही केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्स - याला कूतुहल म्हणा किंवा वेडेपणा पण एका मुलाने एक्सपिरीमेंटच्या नावाखाली स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. फ्रान्समध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने कुराण आणि नंतर बायबलचा अनुवाद करून त्याचा डीएनए तयार केला आणि त्याला शरीरात इंजेक्ट केले. त्यानंतर जगभरात या विचित्र प्रयोगाची बातमी अगदी वेगात पसरली आहे. 


स्वतःला बायोहॅकर म्हणणाऱ्या या व्यक्तीने केलेल्या अनुवादात ब्रह्मांड आणि अल्लाहच्या शक्तीबाबत काही म्हटले गेले आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये राहणाऱ्या अॅड्रियन लोकाटेलीने हा प्रयोग केल्याचा दावा केला आहे. त्याचा दावा खरा ठरला तर एखाद्या धार्मिक मजकुराला डीएनए पॅटर्नमध्ये अनुवाद करून शरीरात इंजेक्ट केले आहे. 


डिजिटल माहितीद्वारे बनवता येऊ शकतो डीएनए 
अॅड्रियनने अनेक शास्त्रज्ञांच्या रिसर्चचा हवाला देत म्हटले की, कोणत्याही डिजिटल माहितीला डीएनएमध्ये बदलणे शक्य आहे. अॅड्रियनने म्हटले, डिजिटल मजकूर डीएनएमध्ये बदलणे शक्य आहे त्यामुळे मी असा विचार केला की, धार्मिक मजकूर डीएनएमध्ये बदलता येतो का हे पाण्यासाठी मी स्वतःमध्ये हा डीएनए इंजेक्ट केला आहे. 


डीएनए प्रोटीन बनवून शरीरात सोडले 
- सर्वात आधी अॅड्रियनने कुराणच्या काही आयातची डिजिटल कॉपी तयार केली. त्यानंतर त्याने प्रत्येक शब्द डीएनएच्या संरचनेत टाकला. डीएनए, अणुमध्ये आपली अनुवांशिक माहिती असते. एसीजीटी (अॅडेनिन, सायटोसिन, गुआनाइन आणि थायमिन) च्या रुपात संक्षिप्तपणे चार रसायनांनी बनलेले असते. अॅड्रियनने यातच प्रत्येक शब्द टाकला आणि नंतर त्याचा नवा डीएनए सेट तयार केला. 
- जेव्हा त्याने ही डीएनए संरचना केली तेव्हा बाजारात सहजपणे मिळणारे काही तत्व आणि अॅमिनो अॅसिड मिसळून नव्या प्रकारचा डीएनए तयार केला. 


शरीरात इंजेक्ट करत धोक्यात घातला जीव 
एड्रियन यानंतर हे लिक्विड त्याच्या मांडीत इंजेक्ट केले. याने आपल्या जीवाला काही धोका नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. पण यामुळे त्याच्या डाव्या पायावर सूज आली आहे. अॅड्रियन असे करेल याची कल्पनाही कधी  कोणी केलेली नव्हती. त्यामुळे आता एक्सपर्ट्स डीएनएबरोबर खेळण्याचा हा प्रकार जीवघेणा असल्याचे सांगत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...