Home | National | Madhya Pradesh | Boy Committed Suicide because Parent Didnt took him to market

मम्मी-पप्पावर क्षुल्लक कारणामुळे नाराज झाला 10 वर्षांचा एकुलता एक, मग जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 03:09 PM IST

गांधीनगरच्या शांतिनगर वस्तीतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बुधवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

 • Boy Committed Suicide because Parent Didnt took him to market

  भोपाळ - गांधीनगरच्या शांतिनगर वस्तीतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बुधवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली. बाजारात जाताना आईवडिलांनी त्याला सोबत नेले नव्हते, म्हणून नाराज होऊन त्याने हे पाऊल उचलले. मोठ्या बहिणीने भावाला फासावर लटकलेले पाहून बाजारात गेलेल्या आईवडिलांना परत बोलावले. मृत मुलगा एकुलता एक मुलगा होता.

  - शांतीनगरातील रहिवासी दुलीचंद पत्नीसोबत मिळून मजुरी करतात. ते येथे दोन मोठ्या मुली आणि छोटा मुलगा 10 वर्षीय धीरज सोबत राहतात.
  - धीरज जवळच्याच सरकारी शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होता. एसआय प्रवीण चौहान यांच्या मते, बुधवारी संध्याकाही पांच वाजता दुलीचंद आपल्या पत्नीसोबत बाजारात जाऊ लागले.
  - धीरजनेही त्यांच्यासोबत बाजारात जाण्याचा हट्ट केला. खूप समजावल्यानंतरही तो ऐकला नाही. यानंतर आईवडील त्याला घरीच मोठी बहीण आरतीसोबत सोडून बाजारात गेले.
  - आरती शेजारच्या घरी गेली होती. काही वेळाने परतल्यावर तिने पाहिले तर धीरजने चादरीचा फास बनवून फाशी घेतली होती. तिचे ओरडणे ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. शेजाऱ्यांनी ताबडतोब आईवडिलांना फोन करून या दु:खद घटनेची माहिती दिली.


  मुलगा असे काही करेल, असा विचारही आला नव्हता : वडील
  - घरी परतलेल्या दुलीचंद यांनी धीरजला फासावरून उतरवून हॉस्पिटलला नेले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर ते एकुलत्या एक मुलाचा मृतदेह घेऊन घरी परतले आणि गांधीनगर पोलिसांना याची माहिती दिली.
  - घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दुलीचंदला सांगितले, आम्हाला वाटले होते की, मुलगा सोबत आल्यास खर्च जास्त होईल. म्हणून त्याला घरीच ठेवले. तो असे काही करेल, असा विचारही केला नव्हता.

Trending