आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक परिस्थितीवर मात करत दहावीत मिळवले 94 टक्के गुण, पण आवडत्या कॉलेजला प्रवेश न मिळाल्याने संपवले आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- काही दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर अकरावी अडमिशनला लवकरच सुरुवात होणार आहे. पण दुष्काळामुळे हलाकिच्या आर्थिक परिस्थितीशी झुंज देऊन 94 टक्के गुण मिळवलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अक्षय शहाजी देवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अकरावीसाठी आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न भेटल्याने त्याने आत्महत्या केली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील देवळाली या गावात ही घटना घडली आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जातं आहे.


देवळाली गावात राहणाऱ्या अक्षयने हलाकिच्या परिस्थितीतही दहावीत घवघवीत यश मिळवले होते. त्याला दहावीत 94 टक्के गुण मिळाले होते. तसेच अक्षयने गणित विषयात 99 गुण मिळवले होते. या गुणांच्या आधारे त्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन डॉक्टर व्हायचे होते. पण आधीच गावात दुष्काळ पडल्याने घरातील आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती. पण त्या परिस्थितीतही त्याने अकरावीला प्रवेश घ्यायचा निश्चय केला. पण त्यापूर्वीच त्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान अकरावीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्याने आज(21जून) आत्महत्या केल्याची चर्चा गावात रंगली आहे. पण आणखी अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नसल्याने त्याने नक्की आत्महत्या का केली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.