आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boy Cries In Pain After His Hand Caught In An Escalator In Agra, People Were Busy Making Video

Escalator मध्ये हात अडकल्यानंतर वेदनेने किंकाळत होता चिमुकला, आणि लोक बनवत होते Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - आधुनिक होत जाणाऱ्या माणसाच्या संवेदना खरोखर मेल्याचा पुरावा आहे व्हिडिओ... हे दृश्य आग्रा एका रेल्वे स्टेशनचे आहे. वेदनेने किंचाळून मदतीची भीक मागणाऱ्या या मुलाचा हात एस्केलेटरमध्ये (सरकत्या जिन्यांमध्ये) अडकला आहे. कित्येक लोक त्याला पाहून निघाले. तर काही थांबलेही... परंतु, त्याची मदत करण्यासाठी मुळीच नाही. त्यांना तर या मुलाचा व्हिडिओ बनवायचा होता. आपल्या खिशातून किंवा पर्समधून मोबाईल काढला आणि रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. जवळपास कुठेही रेल्वेचे कर्मचारी सुद्धा दिसून आले नाही. 15 मिनिटे तो असाच तळपला. त्यानंतर एका भल्या माणसाने एस्केलेटरचे बटन बंद केले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याचा हात बाहेर काढला. तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...