आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी मुलाला ब्रेन डेड घोषित केले, नातेवाईकांनी सुरु केली अंत्यसंस्काराची तयारी; पण आईच्या रडण्याचा आवाज ऐकून जिवंत झाला मुलगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगाणात ब्रेन डेड घोषित केलेल्या 18 वर्षीय मुलाच्या जीवंत होण्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत होती. दरम्यान त्याची आई त्याच्याजवळ बसून रडत होती. आईचे रडणे ऐकून मुलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा प्रकार पाहताच उपस्थित कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


सदरील घटना तेलंगाणाच्या सूर्यपेट जिल्ह्यातील पिल्लालमर्री गावातील आहे. गंधम किरण असे या मुलाचे नाव आहे. गंधमच्या आईने सांगितले की, मी मुलाजवळ बसून रडत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे पाहताच मी माझ्या नातेवाईक आणि डॉक्टरांना बोलावले. 

 

मुलाची प्रकृती आता स्वस्थ आहे
गंधम किरणची आई सैदम्माने सांगितले की, 'डॉक्टरांनी नाडी तपासून तो जिवंत असल्याचे सांगतिले. तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.' हैदराबादच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सूर्यपेट जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर उपचार केले होते. किरणने तीन दिवसांतच सर्वांना ओळखण्यास सुरुवात केली आणि इतरांशी बोलू लागला. रविवारी डॉक्टरांनी किरणला डिस्चार्ज दिला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

 

गंभीर हेपेटायटिस होता
किरणला 26 जून रोजी ताप आणि उल्टी झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला गंभीर हेटेटायटिस झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रकृती बिघडलेली असतानाही त्याला 28 जून रोजी हैदराबादला आणण्यात आले. येथे आणल्यानंतर 3 जुलैपासून तो कोमात गेला. यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले होते.