आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरासमोर मुलाला फासावर लटकलेले पाहून किंचाळले वडील, बाहेर आलेली मुलगीही हरपून बसली शुद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णिया - सॉरी पापा! तुम्ही म्हणाले होते धमदाहा सोड म्हणून मी हे जगच सोडले. बिक्की, रिंकू, बिट्टू, सत्यम आणि किट्टूने माझे पैसे खाल्ले नाही. तुम्ही या सर्वांवर पैशाबाबत लावलेला आरोप खोटा आहे. रविवारी सकाळी दरवाजाबाहेरच्या झाडावर फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या मनीषच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटवर अशा आशयाचा मजकूर होता. 


एका दिवसापूर्वीच घरातून गेला 
माहितीनुसार जिल्ह्याच्या धमदाहामधील टोलाचा राहणारे राजकुमार सिंह यांचा 18 वर्षीय मुलगा मनीष शनिवारी दुपारी घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घराबाहेर पडला नाही. रविवारी सकाळी त्याच्या वडिलांनी दार उघडले तेव्हा समोरड्या झाडावर मुलाला फासावर लटकलेले पाहून ते किंचाळले. ते ऐकूण मृताची बहीण घरातून धावत आली तर तीही समोरचे दृश्य पाहून बेशुद्ध झाली. या प्रकारानंतर आसपासच्या परिसरातील लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. 


बहीण म्हणाली-शनिवारी दुपारीच लिहिली होती सुसाइड नोट 
तरुणाने फाशीसाठी वापरलेली ओढणी बेल्ट घरातीलच आहे. मृताची बहीण म्हणाली की, शनिवारी दुपारी घरातच तिच्या भावाने सुसाईड नोट लिहिले होते. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर निघाला. मृताच्या खिशातून सुसाइड नोटशिवाय मोबाइल आणि आधार कार्ड मिळाले. सुसाइड नोटच्या शेवटी त्याने लिहिले होते-सॉरी पापा, आई, बहीण आणि तुमच्यासाठी काहीही करता आले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...