Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | boy died in car accident

कारच्या अपघातात एक ठार, एक जखमी, गोलवाडी फाट्यावर मध्यरात्री घडला अपघात

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 01:22 PM IST

अपघातात एक ठार, तर अन्य एक जण जखमी

  • boy died in car accident

    वाळूज- काम आटोपून रात्री उशिरा बजाजनगरातील घराकडे परतणाऱ्या मित्रांची कार औरंगाबाद-नगर महामार्गावरील गोलवाडी फाट्यालगतच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात एक ठार, तर अन्य एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास गोलवाडी फाट्यावर घडली.
    श्रावण ऊर्फ गणेश गजानन बिडवे (२६, रा.बजाजनगर) यांचा मृत्यू झाला, तर कारचालक जितू सरकटे (२७, रा. बजाजनगर) हा गंभीर जखमी झाला. श्रावण ऊर्फ गणेश व जितू सरकटे हे दोघे शुक्रवार, १५ मार्च रोजी बजाजनगरातून जितूच्या भावाची कार (एमएच २० ईई ५३३३) घेऊन शहरामध्ये गेले होते.

    काम आटोपून दोघे मध्यरात्री उशिरा घराच्या दिशेने येताना त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हूल दिल्याने कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार एका झाडावर व त्यानंतर दुभाजकावर जाऊन आदळली. यात गणेश गंभीर जखमी झाला.


    त्याच्या छातीला व डोक्याला दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. नागरिकांनी कारचा दरवाजा तोडून गणेश व जितूला बाहेर काढून दोघांना घाटीत दाखल केले. मात्र, गणेशला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जितूवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी छावणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार अशोक खंडाळकर तपास करत आहेत.


Trending