आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यात चोरी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याला गरम फरशीवर उघडे बसवले, यात त्याचा पार्श्वभागाला दुखापत होऊन जळाली त्वचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- येथील आर्वीमधल्या गुरुनानक धर्मशाळेजळील जोगणामाता मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. 7 वर्षांच्या चिमुकल्याला कडक उन्हाने तापलेल्या फरशीवर बळजबरीने बसवले, यात त्याचा पार्श्वभाला दुखापत होऊन त्वचा जळाली आहे. सध्या त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिमुकला दानपेटीतील पैसे चोरत असल्याच्या आरोपावरुन आरोपी अमोल ढोरेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

आर्वीतील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिरात चिमुकला शनिवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास खेळायला गेला होता. यावेळी आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरेने त्याला विवस्त्र करत फरशीवर बसवले. ज्या फरशीवर चपलेशिवाय पाय ठेवणेही अवघड आहे, तिथे आरोपीने  मुलाला विना कपड्याने बसवले. एवढ्यावरच न थांबता त्याने मुलाला फरशीवरच दाबून धरले. यामुळे मुलाचा पार्श्वभाग गंभीररित्या भाजला आहे.


या घटनेनंतर मुलगा रडत घरी गेला आणि घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. याचा जाब विचारला त्याची आई मंदिरात गेली, त्यावेळी आरोपीने पीडित मुलाच्या आईला चिमुकला चोरी करत असल्याचे सांगितले. खरे पाहता पाहता दानपेटीला यावेळी कुलूप होते. आपली चूक मान्य न करता आरोपीने शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचा आरोप मुलाचा आईने केला.


मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे याबाबतीत तक्रार केली. आरोपी उमेश उर्फ अमोलचा दारूचा व्यवसाय आहे, तो याच परिसरात दारूविक्री करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सुद्धा पुढे आले आहे. याप्रकरणाची गंभीरता पाहून तपास केला जात असून, आरोपीवर शनिवारी उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रविवारच्या पहाटे अमित ढोरेला अटक करण्यात आले.