आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक फूट बर्फात १०-१५ किमी पायी जाऊन दिली १० वीची परीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिपूरधार (हिमाचल प्रदेश) - पठारी प्रदेशातील जीवन अतिशय संघर्षमय आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे येथील नागरिकांना अडचणींचा मोठा सामना करावा लागतो. हिमाचल प्रदेशात शनिवारी अशाच काहीशा संकटाला इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. शनिवारी इयत्ता १० वीचा इंग्रजीचा पेपर होता. मात्र शुक्रवारी हरिपूरधार आणि आजूबाजूच्या रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर  एक फूट बर्फ साचला. दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी काही किलोमीटरवरील हरिपूरधार येथील शाळेत पोहोचायचे होते. ९ वाजता पेपर असल्याने विद्यार्थी ६ वाजताचा घरातून निघाले. १० ते १५ किमी सुमारे अडीच ते तीन तास पायी चालत विद्यार्थी शाळेत पोहोचले आणि परीक्षा दिली. 



किडनी आजाराने ग्रस्त, तरीही जिद्द कायम


किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मोराच गावातील इयत्ता १० वीची विद्यार्थिनी डिंपलला देखील ११ किमी पायी चालावे लागले. आजारानंतरही तिची जिद््द कायम आहे. सकाळी पेपर देण्यासाठी वडिलांसोबत पायी गेेलेली डिंपल पुन्हादेखील पायीच चालत आली. 
 

सिमला, कुफरी आणि मनालीमध्ये बर्फवृष्टी, हवेमुळे थंडीत वाढ


सिमला | सिमला, कुफरी अाणि मनालीमध्ये शुक्रवार रात्रीपासून ते शनिवार दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे तापामानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. बर्फवृष्टीचा सिमल्यातील १६० रस्त्यांवर परिणाम झाला आहे. चौपाल परिसर पूर्णपणे बंद आहे. रामपूर आणि किन्नोर येथे मशोबरामार्गे बस सुरू आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जाखूमध्ये चार सेंटीमीटर, कल्पामध्ये ६, कुफरीमध्ये १५, डलहौजीमध्ये १२ आणि खदरालामध्ये २५ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली आहे. तर मैदानी परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. तर आगामी १३ मार्चला पुन्हा हिमवृष्टी होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिमलामध्ये शनिवारी कमाल आणि किमान तापमानात घट झाली.



बातम्या आणखी आहेत...