नवरदेवाच्या मोठ्या भाऊ / नवरदेवाच्या मोठ्या भाऊ बंदूक साफ करताना झाडल्या गेली गोळी; एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, बहिणीचे लग्नही मोडले

Feb 26,2019 02:51:00 PM IST

रतलाम - येथील बाराखेडा परिसरात रविवारी रात्री लग्नाची तयारी सुरू होती. नवरदेवाच्या पाठीमागे सेलिब्रेशन फायरिेंग करण्यासाठी बंदूक साफ केली जात होती. त्याचवेळी गोळ्या झाडल्या गेल्या. यामध्ये दोन लहान मुलांसह तिघे जखमी झाले. हे तिघे नवरदेवाचे मावस भाऊ होते. सर्वांनाच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच रात्री उशीरा एका मुलाचा मृत्यू झाला. हाच मुलगा घरातील एकुलता एक होता. या घटनेनंतर घरात आयोजित करण्यात आलेले दुसरे लग्न रद्द करण्यात आले आहे.


आई-वडिलांना सांगितलेच नाही, मग अचानक आणला मृतदेह
चिराग सोलंकी असे मृत्यूमुखी पावलेल्या मुलाचे नाव असून त्याचे वय 12 वर्षे होते. आई-वडिलांना त्यांचा एकुलता एक मुलगा जगातून गेल्याचे सांगण्यात आलेच नाही. तुमचा मुलगा लग्नाच्या घरातच असून आता सकाळी येईल अशी समजूत काढण्यात आली होती. रुग्णालयात पोस्ट मॉर्टमही करण्यात आले. त्यानंतर अचानक मुलाचा मृतदेह आई-वडिलांना दाखवण्यात आला. त्यावेळी आई-वडिलांचे हाल पाहून सर्वांचे हृदय पिळवटले. मम्मी-पप्पा आणि बहिणी त्याला सोडण्यास तयारच नव्हे, यानंतर नातेवाइकांनीच अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण केली. वडील रमेश यांना तर काही बोलताच येत नव्हते. रडता-रडता ते गेल्या दोन दिवसांपासून झोपलेच नाहीत. अखेर डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन देऊन त्यांना शांत केले.

बाराखेडा परिसरात एकाच घरात दोन लग्न होते. पहिला विवाह मुलाचा होता. त्याच नवरदेवाच्या बहिणीचा विवाह दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी ही दुर्घटना घडल्याने आता नवरदेवाच्या बहिणीचे लग्न रद्द करण्यात आले आहे. कारण, या घटनेची माहिती मिळाली तेव्हा मुलीच्या सासरच्या मंडळींनी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

X