आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नमंडपात ऐनवेळी बदलली नवरी मुलगी, मग फसलेल्या नवरदेवाचे जडले मेहुणीवर प्रेम, लग्नाला विरोध होताच केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधेपुरा (बिहार) - प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने खंडणीसाठी आपल्या प्रेयसीच्या भावालाच किडनॅप केले. तथापि, दोन दिवस त्याने अपहृत बालकाला आपल्या घरी आणले तेव्हा आसपासच्या लोकांना याची लगेच माहिती कळली. मग गावकऱ्यांनी पोलिसांना याची सूचना देताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन 2 आरोपींना अटक केली.

ही घटना फुलौतमधील आहे. अपहृत बालक सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिस अधिकारी महेश कुमार रजक म्हणाले की, कुटुंबीयांनी खरीक पोलिसांत बालकाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तेथील पोलिस आल्यानंतर दोन्ही आरोपी आणि ताब्यात असलेल्या बालकाला त्यांच्या स्वाधीन केले जाईल. आरोपी हा बालकाचा आत्याकडून भाऊजी लागतो. दुसरीकडे, घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली. कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांवर गावकऱ्यांनी दबाव टाकला.

 

लग्नादरम्यान अचानक बदलली नवरी मुलगी
आरोपी तरुण लवकुश कुमार यादवने सांगितले की, त्याचे लग्न सात महिन्यांपूर्वी जिवो यादव यांच्या मुलीशी झाले होते. या लग्नात त्याची फसवणूक करण्यात आली. ज्या मुलीला त्याने पसंत केले होते, तिच्याशी लग्न झाले नाही. लग्नमंडपात अचानक नवरी बदलण्यात आली होती. यामुळे त्याचे सासरच्या मंडळींशी वाद सुरू होते. काही दिवसांनी त्याचे मावस सासऱ्याच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. मुलीने त्याच्या लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा ते दोघेही देवीच्या यात्रेत लग्न करण्याच्या हेतून घरातून पळून गेले. परंतु लग्न करण्याआधीच धनेशपूर गावात दोघांनाही पकडण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी याप्रकरणी समेट घडवला, परंतु या घटनेनंतर ललन यादव तिला मारण्याची धमकी देत होता. याच रागातून त्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले.


बहिणीच्या घरी फिरायला जात असल्याचे सांगून केले अपहरण
खरीक परिसरातील ललन यादव यांचा 12 वर्षीय मुलगा कृष्ण कुमारने सांगितले की, मंगळवारी तो शाळेच्या मैदानावर सायकल खेळत होता. तेवढ्यात बाइकवर स्वार होऊन त्याचा मावस भावजी लवकुश कुमार यादव, जगदेव यादव आणि आशिष कुमार आले. चौकशी केल्यावर लवकुश कुमारने त्याला आपल्या बहिणीच्या घरी फिरायला चल म्हणत बळजबरी सोबत नेले. बहिणीच्या घरी पोहोचून त्याने कृष्णाची सायकल ठेवली आणि रात्री त्याला बाइकवर बसवून नवगछियाला घेऊन गेले. दिवसभर त्याला गुप्त ठिकाणी ठेवून बुधवारी रात्री त्याला फुलौतला आणले. गुरुवारी पहाटे जेव्हा बालकाच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा गावकऱ्यांनी चौकशी केली. बालकाने सांगितले की, हे लोकं म्हणताहेत की, तुझ्या बापाने 5 लाखांची खंडणी दिली नाही, तर तुला जिवे मारून नदीत फेकून देऊ. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने आरोपी पळून जाऊ लागला. परंतु गावकऱ्यांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना पकडले.

 

 

बातम्या आणखी आहेत...