आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता युवक, पण त्याला माहित नव्हते की, ही त्याची शेवटची भेट असेल, अंधारात वाट पाहत होता मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीवान(बिहार)- एम.एच. नगर परिसरातील अरूण यादवच्या खूनानंतर मृतदेहाला रेल्वे ट्रकवर फेकल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. सांगितले जात आहे की, अरूण आपल्या प्रेयसीला भेटायला ननिहाल आणि सारण जिल्ह्यात गेला होता. शनिवारी रात्री घरात अज्ञात युवकाला पाहून चोर असल्याचे नाटक करत अरूणला बेदम मारले. तरूणीने अरूणला मार खाताना पाहिले तेव्हा तिने त्याच्या घरच्यांना फोन करून माहिती दिली. या जबर मारहाणीत अरूणचा मृत्यू झाला, त्यानंतर हा खून नसून आत्महत्या आहे असे दाखवण्यासाठी मुलीच्या घरच्यांनी मृतदेहाला रेल्वे ट्रॅकवर फेकले. 


सात जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा
अरूणचे वडील अजीत यादव शनिवारी मध्यरात्री तरूणीच्या गावी पोहचले. तिथे गेल्यावर त्यांनी आपल्या मुलाबद्दल विचारले, पण कोणीच काही सांगितले नाही. त्यानंतर अरूणच्या वडिलांनी रविवारी तरूणीच्या वडिलांसोबत तिचा भाऊ, काका आणि इतर अशा सात लोकांविरूद्ध अपहरण आणि खूनाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या सातही आरोपींना ताब्यात घेतले.
 

बातम्या आणखी आहेत...