आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - शकीलचे खुशनसिबा हिच्यावर पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम होते. या एकतर्फी प्रेमातूनच तो खुशनसिबा हिच्याशी लग्न करण्याच्या इराद्याने 20 ऑगस्टला दुबईहून जयपूरला आला होता. खुशनसिबाने जेव्हा लग्नाला नकार दिला तेव्हा शकीलने तिची हत्या करण्याचा कट रचला. गेल्या तीन चार दिवस को खुशनसिबाच्या घराच्या आसपास फिरत राहिला. रविवारी सायंकाळी तो चाकू घेऊन थेट घरात घुसला आणि हल्ला करत खुशनसिबाची हत्या केली. चौकशीत त्याने सांगितले की, हत्येनंतर तो परत दुबईला पळून जाणार होता. त्यासाठी त्याने तिकिटही बूक केले होते, पण स्थानिक लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले.
यामुळे रचला हत्येचा कट
शकीलने सांगितले की, खुशनसिबाला लग्नासाठी विचारले होते. पण ती त्याला पुन्हा पुन्हा नकार देत राहिली. नंतर तिने फोन उचलनेही बंद केले होते. त्याने अनेकदा तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे तो दुबईहून भारतात आला होता. त्याला वाटले होते की ती ऐकेल, पण यावेळी तर तिने हद्दच केली. तिने लग्नाला थेट नकार दिला. त्यामुळे शकीलने तिच्या हत्येचा कट रचला.
आधी गळा चिरला, मग छातीत चाकू खुपसला
मृत खुशनसिबाच्या शरीरावर 9 वार होते. तर तिची आई अख्तरीच्या शरिरावर 12 वार करण्यात आले. शकीलने पोलिसांना सांगितले की, त्याने घरात शिरताच खुशनसिबाचा गळा कापला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर वार केले. ती खाली पडायला लागली तेव्हा छातीत चाकू खुपसला. हा रक्तपात सुरू असताना खुशनसिबाची आई अख्तरी बानो पळत आली तर तिलाही त्याने चाकू खुपसला. अख्तरी बानो सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. कुटुंबीयांनी तिला खुशनसीबाच्या मृत्यूबाबत सांगितलेले नाही.
तरुणांना पाठलाग करत पकडले
हल्ल्यानंतर आरोपी शकील पळून जाऊ लागला तेव्हा छतावर पतंग उडवणारा भाऊ ओरडला. त्यानंतर खाली असलेल्या तरुणांना काय ते समजले. शकीलच्या हातातील पक्ताने माखलेला चाकू पाहून सर्वांच्या लक्षात आले. चार तरुणांनी जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्याला पकडले. काही वेळाने पोलिस आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.