Home | International | Other Country | Boy Overwhelmed At Meeting Queen Elizabeth, Crawls Away

ब्रिटनच्या राणीची भेट घेतल्यानंतर मुलाने दिली अशी Reaction, इंटरनेटवर झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 11:10 AM IST

गुडघ्यांवर बसला आणि मागे वळून आपल्या आईच्या पायातून रेंगाळत निघून गेला.

  • Boy Overwhelmed At Meeting Queen Elizabeth, Crawls Away

    लंडन - ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ अचानक समोर आल्यानंतर कुणीही भारावून जाईल हे साहजिक आहे. परंतु, एका मुलाने राणीला पाहून जे काही केले, तो इंटरनेटवर व्हायरल झाला. ब्रिटनच्या कोरम येथील एका चॅरिटी इव्हेंटमध्ये राणी एलिझाबेथ आल्या होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी लोक थांबले होते. त्यामध्येच एक 9 वर्षांचा मुलगा नाथन ग्रँट सुद्धा होता. त्याने यापूर्वीह कधीही राणीला प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. अचानक राणी एलिझाबेथ आल्या आणि सर्वांनी त्यांना अभिवादन केले. पण, नाथन स्तब्ध उभा होता. राणीने स्मितहास्य करत त्याला नाव विचारले तेव्हा तो इतका पॅनिक झाला, गुडघ्यांवर बसला आणि मागे वळून आपल्या आईच्या पायातून रेंगाळत निघून गेला. बाहेर जाण्याचा दार येत नाही तोपर्यंत तो थांबलाच नाही. यानंतर बाहेर जाऊन हळूच साश्रू नयनांनी Bye म्हटले.


    या गंमतीशीर घटनेच्या वेळी तेथे उपस्थित काही माध्यमांनी तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. काहींनी तो सोशल मीडियावर पोस्ट देखील केला. नाथनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याला आपल्याशी जोडत आहेत. एकाने लिहिले, मी माझ्या लग्नात असेच काही करणार होतो. केले असते तर आज लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला नसता. दुसऱ्या एकाने लिहिले, 2018 संपताना प्रत्येकाची अवस्था काहीशी अशीच आहे.

  • Boy Overwhelmed At Meeting Queen Elizabeth, Crawls Away
  • Boy Overwhelmed At Meeting Queen Elizabeth, Crawls Away

Trending