आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांचा तरूण अचानक बनला तरूणी, अद्याप उलगडू शकले नाही रहस्‍य, प्रशासनाचे तपासाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली (राजस्थान) - जिल्‍ह्यातील राजपूरा गावात 20 वर्षीय तरूण भीखाराम अचानक स्‍त्री बनला. तो आता स्‍वत:ला साध्‍वी माया म्‍हणवत आहे. यातील सत्‍यता तपासण्‍यासाठी बुधवारी जिल्‍हाधिका-यांनी एका कमिटीची स्‍थापना केली. यात डॉक्‍टर्स, एसडीएम आणि तहसिलदार आहेत. गुरूवारी ही टीम त्‍याच्‍या घरी पोहोचली. 

 

मात्र धर्माचा हवाला देत भीखारामने प्रथम स्‍वत:ची तपासणी करण्‍यास नकार दिला. मात्र एसडीएम अजय चारण यांनी कठोर भुमिका घेतल्‍याने अखेर यासाठी भीखाराम राजी झाला.


कमिटीतील मेडिकल सदस्‍यांनांही भीखारामसोबत नेमके घडले काय, हे अद्याप पुर्णपणे समजू शकलेले नाही. मात्र त्‍यांचे म्‍हणणे आहे की, हा बदल एका रात्रीत झालेला नाही. हार्मोन्‍सचे असंतुलन झाल्‍यास असे होऊ शकते. या पुर्ण घटनाक्रमाचा तपास करण्‍यासाठी आता भीखारामची आता डीएनए चाचणीही केली जाणार आहे. 


दैनिक भास्‍करमध्‍ये वृत्‍त येताच जिल्‍हाधिका-यांचे तपासाचे आदेश 
दैनिक भास्‍करच्‍या बुधवारच्‍या अंकात हे वृत्‍त प्रकाशित झाले होते. याची गंभीरतेने दखल घेत जिल्‍हाधिका-यांनी मेडिकल टीमची स्‍थापना केली व चौकशी करून लवकरात लवकर अहवाल देण्‍याचे निर्देश या कमिटीला दिले.  


नेमकी कशी घडली घटना 
भिखाराम बंगळुरूमध्ये काम करतो. 16 सप्टेंबरला तो गावाकडे आला. या दिवशी त्याने कुटुंबीय आणि मित्रांना जलसमाधी घेणार असल्याचा मॅसेज सोडून निघून गेला. भिखारामने गावाजवळील विहिरीत उडी मारल्याचा दावा केला. त्यानंतर शुद्धीत आल्यानंतर तो विहिरीच्या बाहेर पडलेल्या अवस्थेत पूर्णपणे स्त्रीमध्ये रूपांतरित झालेला होता. मात्र तरूणाने याचे पूर्वीपासूनच नियोजन केले होते अशी शंका व्‍यक्‍त केली जात आहे. शंकेमागे प्रमुख तीन कारणे आहेत. 

 

पहिले कारण...बंगळुरूहून येताच जैतपूरमधून पुजेचे सामान आणले 
भास्‍कर टीमने भीखारामच्‍या गावात जाऊन त्‍याचे नातेवाईक आणि जवळील व्‍यक्‍तींशी चर्चा केली. त्‍यापैकी एका नातेवाईकाने दावा केला आहे की, भीखाराम ज्‍या दिवशी बंगळुरूहून आला ही घटना त्‍याच दिवसाची आहे. या घटनेपूर्वी भीखाराम जैतपूरला गेला होता व तेथून पुजेचे सामान आणून त्‍याने तलावावर पुजा केली होती. 


दुसरे कारण...4 वर्षे होता बंगळुरूत, याच दरम्‍यान बदल झाल्‍याची शक्‍यता 
कमिटीतील मेडिकल सदस्‍यांनी दावा केला आहे की, हार्मोन्‍स असंतुलनामुळे हा बदल झाला असण्‍याची शक्‍यता 70 ते 80 टक्‍के आहे. यादरम्‍यान भीखाराम बंगळुरूत होता. कदाचित आपल्‍या याच बदलाला लपवण्‍यासाठी त्‍याने ही योजना बनविली असेल. जेणेकरून बदनामीही टाळता येईल व त्‍याचे नवे रूप स्‍वीकारलेही जाईल. 

 

भिखाराम म्हणाला - आता परमेश्वराच्या आदेशाने मी स्त्री रूपात जीवन व्यतीत करणार...
स्वतःचे नाव साध्वी माया ठेवले आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा सुरु केली. परमेश्वराच्या आदेशाने मी स्त्री रूपात जीवन व्यतीत करणार असल्याचे सांगितले.

 

 

 

 

 

  

बातम्या आणखी आहेत...