आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत उडी घेतल्‍यानंतर तो अचानक बनला मुलगी, आता समोर आले हे धक्‍कादायक सत्‍य, डॉक्‍टरांनीही दिला दुजोरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भीखारामची मेडिकल तपासणी करताना डॉक्‍टर मीनल जैन आणि महेंद्र चौधरी. - Divya Marathi
भीखारामची मेडिकल तपासणी करताना डॉक्‍टर मीनल जैन आणि महेंद्र चौधरी.

पाली (राजस्‍थान) - जिल्‍ह्यातील रोहट येथील राजपूरामध्ये राहणा-या 20 वर्षीय तरूणाने 16 सप्‍टेंबररोजी जलसमाधी घेतली होती. त्‍यानंतर आपण साध्‍वी मायामध्‍ये रूपांतरित झाल्‍याचा दावा या तरूणाने केला होता. अखेर त्‍याच्‍या मेडिकल तपासणीनंतर या नाट्यमय घटनेमागचे सत्‍य उजेडात आले आहे. सोनोग्राफीचा अहवाल आल्‍यानंतर भीखारामची चौकशी केली असता त्‍याने मान्‍य केले की, 5 महिन्‍यांपूर्वी त्‍याने मुंबईत लिंग परिवर्तन ऑपरेशन केले. समाज, कुटुंबाकडून याला मान्‍यता मिळावी म्‍हणून त्‍याने याला धर्माशी जोडले. शनिवारी मेडिकल रीपोर्ट समोर आल्‍यानंतर हे सर्व उजेडात आले. कुटुंबालाही याबाबत कळविण्‍यात आले. आता कुटुंबानेही त्‍याला आहे त्‍या रूपात स्‍वीकारण्‍यास तयारी दर्शविली आहे.


16 सप्‍टेंबरोजी सुरू झाला साध्‍वी बनण्‍याचा ड्रामा
भीखाराम 5 वर्षांपासून बंगळूरूमध्‍ये एका दुकानात नौकरी करत होता. 16 सप्‍टेंबररोजी तो घरी परतला. घरी त्‍याने सर्वांना सांगितले की, ईश्‍वराच्‍या आदेशानूसार तो जलसमाधी घेत आहे. 18 सप्‍टेंरबर रोजी सकाळी तो घरी आला. घरी आल्‍यावर त्‍याने सांगितले की, समाधीनंतर शुद्धीत आल्‍यानंतर विहिरीच्‍या बाहेर आलो, तेव्‍हा आपण एक मुलगी बनलो असल्‍याचे आपल्‍या लक्षात आले. घरी आल्‍यानंतर भीखारामने महिलांचे कपडे घातले आणि सांगितले की, ईश्‍वराच्‍या आदेशानूसार तो आता एक मुलगी बनला आहे.

 

युट्यूबवर व्हिडिओ पाहून पोहोचला मुंबईत
भीखारामने सांगितले की, '14-15 वर्षांचा असल्‍यापासूनच मला मी मुलगी असल्‍याचे वाटत होते. माझ्या भावनाही तशाच होता. त्‍यानंतर युट्यूबवर लिंग परिवर्तन केलेल्‍या लोकांचे मी व्हिडिओ पाहिले. तसेच हे कसे करतात याचीही माहिती मिळवली. त्‍यानंतर मुंबईत एका हॉस्प्टिलमध्‍ये जाऊन मी लिंगपरिवर्तन ऑपरेशन करवून घेतले.'


आणि भीखारामने सांगितले सत्‍य
मेडिकल बोर्डच्‍या सदस्‍या, डॉ. मीनल जैन व डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितले की, सोनोग्राफीच्‍या रिपोर्टमध्‍ये पुरूष व महिला दोहोंचेही जननांग नव्‍हते. त्‍यानंतर भीखारामची काऊन्‍सलिंग केली असता, त्‍याने खरे काय ते सांगितले. मुंबईत ज्‍या हॉस्प्टिलमध्‍ये त्‍याने ऑपरेशन केले तेथूनही आम्‍ही माहिती मिळवली. हॉस्पिटलनेही भीखारामच्‍या दाव्‍याला पुष्‍टी दिली.'


समाजाने चुकीच्‍या नजरेने पाहू नये म्‍हणून घेतला हा निर्णय
भीखारामने सांगितले की, त्‍याला लहानपणापासूनच मुलींप्रमाणे रहावेसे वाटत होते. जसजस मोठा होत गेले तसतशा त्‍या भावना आणखी प्रबळ होत गेल्‍या. मी भगवान महादेवाचा भक्‍त आहे. या शारीरीक बदलांना ईश्‍वराचीच इच्‍छा मानत मी लिंग परिवर्तन ऑपरेशन करण्‍याचा निर्णय घेतला. समाजाने चुकीच्‍या नजरेने पाहू नये म्‍हणून मी हा ड्रामा केला. आता सत्‍य त्‍यांच्‍यासमोर आले आहे. त्‍यांनी व कुटुंबीयांनी मला आहे तसे स्‍वीकारावे ऐवढीच माझी इच्‍छा आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...