Home | Khabrein Jara Hat Ke | Boy Wrote Letter to God asking to send a new face As Fire Accident Melted His Face

आगीत होरपळून मुलाचा चेहरा बनला असा, देवाला लिहिलेले पत्र वाचून येईल डोळ्यात पाणी, आरशात स्वतः पाहून घाबरतो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 01:21 PM IST

5 वर्षांच्या बख्तियार सिंद्रोव याने आता देवाला एक पत्र लिहिले आहे, ते वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येते.

 • Boy Wrote Letter to God asking to send a new face As Fire Accident Melted His Face

  उझबेकिस्तान - येथील एका गावात राहणारा एख मुलगा आरशात स्वतःचा चेहरा पाहिला की, प्रचंड घाबरून जातो. एका दुर्घटनेमध्ये आगीत तो असा काही होरपळला की त्याचा संपूर्ण चेहराच खराब झाला. त्यामुळे रात्री जर सव्तःचा चेहरा पाहिला तर घाबरून तो रात्रभर झोपू शकत नाही. 5 वर्षांच्या बख्तियार सिंद्रोव याने आता देवाला एक पत्र लिहिले आहे, ते वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येते.


  देवा मला नवा चेहरा दे..
  - 5 वर्षांच्या वयात या भयावह दुर्घटनेचा सामना केलेल्या बख्तियारने पत्रात लिहिले, देवा मला प्लीज नवा चेहरा दे. आता ख्रिसमस येत आहे तर सांताच्या हातून माझ्यासाठी नवा चेहरा पाठवा.
  - बख्तियार स्वतः लिहू शकत नाही, त्यामुळे तो त्याच्या मनातले बोलत राहिला आणि त्याचे वडील पत्र लिहीत होते. चिमुरड्या मुलाच्या वेदना आणि भावूक गोष्टींमुळे त्याच्या मनालाही चांगलाच धक्का बसला.


  मला इतर मुलांसारखे दिसायचे आहे...
  बख्तियारने पत्रात पुढे म्हटले, देवा मला इतर मुलांसारखे दिसायचे आहे. मलाही शाळेत जायेच आहे. प्लीज लवकर माझ्यासाठी नवा चेहरा पाठव. मला रात्रीची फार भिती वाटते. माझा चेहरा फार भीतीदायक झाला आहे. माझे कान, नाकही गायब झाले आहेत.


  मी नाही, आई रडत असते..
  बख्तियार पुढे म्हणतो, आई सांगते की, मी शाळेत जाऊ शकणार नाही. पण मला शाळेत जायचे आहे. मला अनेकदा खूप वेदना होतात. पण मी रडत नाही, माझी आई मात्र रडते. फादर ख्रिसमसला प्लीज एक नवा चेहरा पाठवून द्या. मी पुन्हा कधीही रडणार नाही.


  सर्जरीमुळे मिळाले ओठ
  बख्तियारचा चेहरा पूर्णपणे होरपळला होता. याचवर्षी जूनमध्ये सर्जरीकरून त्याला ओठ बसवण्यात आले. डॉक्टर डिसेंबरमध्ये आणखी एक सर्जरी करून त्याचा चेहरा ठीक करण्याचा प्रयत्न करणार आहेत.


  आर्थिक स्थिती हलाखीची
  बख्तियारच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे अनेक दिवस त्याच्या चेहळ्याची सर्जरी होऊ शकली नाही. नंतर एका एनजीओला त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला मदत मिळाली.

  भारतात मिळेल नवा चेहरा
  मीडिया रिपोर्ट्सनुसार बख्तियारचे कुटुंब त्याच्या प्लास्टीक सर्जरीसाठी भारतात पोहोचले आहे. त्याला किमान जरा वेगळा नवा चेहरा मिळेल अशी आशा आहे.


  असा भाजला होता चेहरा
  रिपोर्ट्सनुसार लहानपणी बख्तियार दुर्घटनेत भाजला होता. घरात तयार केलेल्या फायर प्लेसच्या जवळ तो बेबी सिटरमध्ये झोपला होता, तेव्हा त्याठिकाणी स्फोट झाला आणि तो होरपळला होता.

 • Boy Wrote Letter to God asking to send a new face As Fire Accident Melted His Face
 • Boy Wrote Letter to God asking to send a new face As Fire Accident Melted His Face

Trending