आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर मुंबईत पंधरा दिवस प्रियकरासह मित्राचा अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नातेवाइकांकडे आलेल्या शिर्डी येथील तरुणीला लग्नाचे आमिष देत मुंबई येथे नेऊन एका घरात डांबून ठेवत प्रियकर आणि त्याच्या मित्राने पंधरा दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित प्रियकर अविनाश धनराज माकुणे (रा.श्रीरामपूर) यास अटक करण्यात आली आहे. मित्र संतोष खरात फरार आहे. पीडितेने सुटका केल्यानंतर नातेवाइकांना हा प्रकार सांगितला.  संशयितांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित अविनाश माकुणे याच्यासोबत तिची ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नाशिकमध्ये ती नातेवाइकांकडे आली असताना संशयिताने लग्न करण्याचे आमिष दिले. तपोवन येथून बोलवून घेत सिन्नर येथे नेले. लग्नासाठी पैशांची गरज असल्याने गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याची चेन काढून घेतली. तसेच लग्नाचे आमिष देत बळजबरीने शरीरसंबंध केले. त्याचा मित्र संतोष खरात याच्या सोबत लासलगाव, मालेगाव, सूरत येथे नेले. येथून ठाणे येथील घनसोली नवी मुंबई  येथे  अण्णा नामक व्यक्तीच्या घरात पंधरा दिवस डांबून ठेवले. पळून जाण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी पीडितेला दोरीने बांधून ठेवत प्रियकराने बलात्कार केला. त्याच्या मित्राने बळजबरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

दुसरा आरोपी फरार
याबाबत परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर अण्णाचा मित्र समीर नावाच्या  मित्राच्या कौपरखैनी येथे नेले. तिथेही घरात  बांधून ठेवत दोघांनी बळजबरीने बलात्कार केला. पीडितेने कशीबशी स्वत:ची सुटका करत नाशिक गाठले, घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला.  त्यानंतर शिर्डी येथील आई-वडिलांनी नाशिकमध्ये येत मुलीला धीर देत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताला श्रीरामपूर येथे अटक केली. दुसरा संशयित खरात फरार आहे.