आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर लाइक्स मिळविण्यासाठी युवकाने भावी पत्नीसोबत केली भयानक गंमत, त्या गमतीचा मुलीला सहन करावा लागला भयंकर त्रास; वेदनेने विव्हळत असताना शूट केला विडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हटके डेस्क -  सध्या सोशल मिडीया मानवाच्या जीवणाचा एका भाग झाला आहे. जगभरातील बरीच लोक सोशल मिडीयावर आहेत. सोशल मिडीयावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक ना-ना प्रकारच्या युक्त्या लढवत असतात. अशातच एका युवकाने सोशल मिडीयावर जास्तीत जास्त लाइक्स मिळविण्यासाठी भावी पत्नीसोबत असे काही केले ज्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्याने आपल्या भावी पत्नीच्या टेम्पॉनवर (पीरियड्सच्या काळात आतमध्ये परिधान करण्यात येणारे सॅनेटरी पॅड) मिर्ची लावली होती. या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या त्या मुलीने टेम्पॉनचा वापरही केला. यानंतर ती होणाऱ्या त्रासामुळे परेशान होत होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या तरुणाने त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या भावी पत्नीचा विडिओ शूट केला आणि सोशल मिडीयावर शेअर केला. त्याने 20 लाख लाइक्स मिळविण्यासाठी हा सर्वप्रकार केला होता. 


तरुणाने आपल्या भावी पत्नीसोबत केली हिडीस गंमत

>  फेमस यू-ट्यूबर ब्रेड होल्म्स याने आपल्या होणाऱ्या बायकोची अतिशय वाईट गंमत केली आणि त्याचा विडिओ तयार करून सोशल मिडीयावर शेअर केला. त्याने भावी पत्नीच्या सॅनेटरी पॅडवर लाल मिर्ची लावली होती. त्यामुळे तरुणीची अवस्था अत्यंत खराब झाली होती. 

> ब्रेडने या विडिओमध्ये सुरूवातीला तो बाथरूममध्ये जेनीच्या टेम्पॉनवर गुप्तपणे लाल मिर्च घासताना दिसत आहे. त्यानंतर जेथून त्याने टेम्पॉन घेतले होते तिथेच परत ठेवले. 

> त्यानंतर जेनी आतमध्ये आल्यानंतर टेम्पॉन वापरते. काही मिनिटातच तिला त्रास व्हायला सुरूवात होते आणि तिच्या आईला याबद्दल सांगते. त्यावेळी तिथे उपस्थित ब्रेड तिची अवस्था पाहून हसायला लागतो. 

>  जेनी बाथरूममध्ये जाऊन त्रास कमी व्हावा यासाठी जळजळ होणाऱ्या जागा पाण्याने साफ करते. तेवढ्यात ब्रेड तेथे येऊऩ तिला मिर्ची दाखवतो आणि त्याने टेम्पॉनवर काय केले ते सांगतो. 

> सत्य माहीत झाल्यावर जेनी खूप क्रोधीत होते आणि रागाच्या भरात बाथरूमचा दरवाजा बंद करते. दरम्यान ब्रेड हसत हसत तेथून निघून जातो. 

> विडिओ शेअर झाल्यानंतर जास्त व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा विडिओ बघितला आहे. पण बऱ्याच यूजर्सनी याला अपमानास्पद सांगितले आहे. 


सोशल मिडीयावर सुरू आहे विचित्र ट्रेंड

> तरुणाने 'क्लाउटलाइटिंग' या ट्रेंड अंतर्गत हे काम केले आहे. सोशल मिडीयावर जास्तीत जास्त लाइक्स मिळावे यासाठी लोक आपल्या साथीदारांसोबत कोणत्याही परिस्थितीत गंमत करतात आणि त्यांना होणाऱ्या त्रासाचा, दुःखाचा किंवा चिडतानाचा विडिओ करून सोशल मिडीयावर अपलोट करतात. 

> 'क्लाउट' आणि 'गॅसलाइटिंग' या दोन शब्दांनी मिळून 'क्लाउटलाइटिंग' शब्द तयार झालेला आहे. क्लाउट म्हणजे सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवणे आणि गॅसलाइटिंग म्हणजे एका अशा व्यक्तीपासून जो दुर्व्यवहार केल्यानंतर पीडितांनाच संभ्रमात टाकेल.
> यांसारख्या विडिओचे वैशिष्ट्य असे असते की, खोडी किंवा गंमत जितकी जास्त चीड आणणारी किंवा हिडीस असते, तयार करणाऱ्याला तितकेच जास्त लाइक्स, फॉलोअर्स आणि प्रसिद्धी मिळते. 

बातम्या आणखी आहेत...