Murder / प्रियकराने लाॅजमध्ये ब्लेडने वार करून अल्पवयीन प्रेयसीचा केला खून

भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात केले ब्लेडने केले वार 

Sep 06,2019 08:52:00 AM IST

पुणे - अल्पवयीन प्रेयसीला लाॅजवर बाेलावून तिच्याशी वाद घातल्यानंतर प्रियकराने तिच्या हातावर, गळयावर आणि पाेटावर ब्लेडने वार करून तिचा खून केल्याची घटना वडगाव मावळ येथील निर्सगवारा लाॅज येथे घडली. मंगल (नाव बदलले आहे, वय १७, रा. आंबी, पुणे) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून याप्रकरणी तिचा प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी (मु,रा. बीड) याच्याविरोधात पोलिसंनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव दाभाडे एमआयडीसी जवळ निर्सगवारा लाॅज आहे. याठिकाणी बुधवारी मंगल व श्रीराम गिरी हे लाॅजवर खाेली क्रमांक ३०३ मध्ये थांबले हाेते. काहीवेळाने दाेघांमध्ये भांडण झाल्यानंतर श्रीराम याने मंगलच्या हात, गळा आणि पाेटावर सपासप वार केल्याने रक्तस्त्राव हाेऊन तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकर पसार झाला. ताे जात असतानाच लाॅजच्या एका कर्मचाऱ्याने त्याला विचारणा केली असता, त्याने प्रेयसी खाेलीत असल्याचे सांगितले. त्यानंतर लाॅज व्यवस्थापकाला संशय आल्याने त्यांनी खोलीची पाहणी केली असता त्याठिकाणी मुलगी मृतावस्थेत आढळली. त्यामुळे त्यांनी पाेलिसांना यासंर्दभात कळवले. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला.

X