आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boyfriend Secretly Murdered Girlfriend And Dumped Her Body On A Railway Track In Jalna

बायको सोडून गेल्यानंतर प्रेयसीला भेटायला गेला, तिचेही लग्न झाल्याचे कळाले; हत्या करून रेल्वे रुळावर फेकला मृतदेह

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जालना/चंदनझिरा : आइस्क्रीम खायला जाऊ म्हणून तरुणाने मुलीस अंबड रोडवर बोलावून घेतले. यानंतर तिच्याच स्कूटीवरून इंदेवाडी येथे नेले. त्या ठिकाणी तरुणीने माझे आता लग्न झाले आहे. आपल्याला आता भेटता येणार नाही, असे सांगून मोबाइलमधील लग्नाचे फोटो दाखवले. यामुळे रागात आलेल्या प्रियकराने मला बायकोने सोडले, तू का लग्न केले, असे म्हणत काहीतरी जड वस्तू तिच्या डोक्यात मारल्याने ती तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर त्याने ओढणीने त्या बेशुद्ध तरुणीला स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले व हळूहळू अंधारात स्कूटी मोतीबागेच्या रेल्वे रुळापर्यंत आणली. स्कूटी बाजूला उभी करून तिला रेल्वे रुळावर टाकले. यानंतर तिच्याच मोबाइलहून अविनाश वंजारे याच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची सुसाइड नोट व लग्नाचे फोटो मोबाइलमधील विविध नंबरवर पाठवून फरार झाला. परंतु, पोलिसांनी चांगला तपास करून तिच्याच शेजारी राहणाऱ्या सचिन गायकवाड यास ताब्यात घेऊन या 'क्रिटिकल' गुन्ह्याची उकल केली.

जालना शहरातील मोती बागेजवळील म्हाडा कॉलनीजवळील रेल्वे रुळावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दीपाली रमेश शेंडगे (जालना) मृत मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणात प्रारंभी पोलिस ठाणे चंदनझिरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. 

घटनास्थळावर त्या मृत तरुणीची स्कूटी, कॉलेज बॅग, मोबाइल मिळून आला होता. मोबाइलवरून मुलीच्या सर्व नातेवाइकांना काही फोटो व एक सुसाइड नोट मिळाली होती. ज्यात अविनाश वंजारे याच्यामुळे मी सुसाइड करत असल्याचे मेसेज पाठवले होते. दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अविनाश वंजारे व इतर लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परतूर येथून अविनाश वंजारे यास ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तपासात सर्व घटनाक्रम प्रथमदर्शी बनाव असल्याचे लक्षात आल्यावर डीवाएसपी सुधीर खिरडकर यांनी पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना एक विशेष पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपासात म्हाडा कॉलनी येथे मुलीच्या शेजारी राहणाऱ्या सचिन गायकवाड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, पीएसआय सुनील इंगळे, प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, श्रद्धा गायकवाड, नंदकुमार ठाकूर, अजय फोके, गोविंद पवार यांनी ही कारवाई केली आहे.

मला तिने धोका दिला म्हणून अद्दल घडवण्याचा प्रयत्न

या प्रकरणात कर्मचारी अनिल काळे यांना मृत मुलीशी त्यांच्याच शेजारी असलेला सचिन गायकवाड याचे काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. घटनेच्या दिवसापासून सचिन गायकवाड हा म्हाडा कॉलनीमध्ये दिसून येत नव्हता. या प्रकरणात त्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पुराव्याचा आधारे त्याच्याकडून या गुन्ह्याची कबुली मिळवली.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

सचिन गायकवाड याने इंदेवाडी येथे दीपाली हिस मारहाण केल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. यामुळे तिला त्याने स्कूटीवरूनच रोडने आणले होते. यामुळे पोलिसांनी या तपासासाठी अंबड रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ठिकाणी ही स्कूटी जाताना तिच्या पाठीमागे ही तरुणी डोके टाकून असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चक्रे फिरवल्याने तपासाला कलाटणी

खून करून त्यात दुसऱ्याला अडकवण्याचा केलेला प्रयत्न होत होता. परंतु, ज्याने हा गुन्हा केला तो मात्र स्पष्टपणे सांगितल्यामुळे, तसेच त्याचे लोकेशनही विरुद्ध दाखवत असल्याने चक्रे फिरवली. यामुळे तपासाला कलाटणी येऊन गोपनीय पद्धतीने मुख्य आरोपी समोर आणला. - सुधीर खिरडकर, डीवाएएसपी.

प्रेयसीचा खून; पतीसही अडकवण्याचा होता कट

सचिन गायकवाड याचे मृत तरुणीसोबत पूर्वी प्रेमप्रकरण होते. हे प्रकरण समजल्यावर त्याची पत्नी माहेरी निघून गेली. त्यादरम्यान त्या तरुणीचे देखील अविनाश वंजारे यांच्यासोबत सूत जुळले होते. त्यातूनच गायकवाड याने तरुणीचा खून करून वंजारे यास त्यात अडकवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...