अमेरिका / खोल पाण्यात प्रेयसीला प्रपोज करणे प्रियकराला जीवावर बेतले, श्वास न घेता आल्याने झाला मृत्यू

प्रेयसीने घटनेचा व्हिडिओ शेअर केला

Sep 22,2019 04:27:00 PM IST

पेम्बा आयलंड- अमेरिकेतील लुइसियानाचा स्टीवन बीबर खोल पाण्यात जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज करत होता, तेव्हा श्वास न घेता आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा वीबर आपली प्रेयसी एंटोइनेसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तंजानियाच्या पेम्बा आयलंडवर गेला होता. एंटोइनेने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या घटनेची माहिती दिली.


या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात वीबर खोल पाण्यात गेलेला दिसतो. त्यानंतर तो आपल्या जवळील एक जिपलॉक बॅग काढून त्यातील लेटर दाखवतो. त्यावर तो एंटोइनेला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. त्यानंतर तो अंगठी काढून तिला दाखवतो, पण याचवेळी त्याचा श्वास थांबतो आणि त्याचा मृत्यू होतो.

X