Home | National | Other State | Boys gang makes girls private and blackmails her

अश्लील व्हिडीओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करायची मुलांची टोळी, लुबाडले लाखो रूपये, नंतर झाला खुलासा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2019, 12:03 AM IST

मुलीने आपल्या आईचे दागिणेही चोरले.

 • Boys gang makes girls private and blackmails her

  रायपूर(छत्तीसगढ)- राजधानी रायपूरमध्ये पोलिसांनी एका अशा गँगला पकडले आहे, जे अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रूपये लुबाडायचे. हैराणीची बाब म्हणजे या गँगमधले बहुतेक मुल हे स्वत: विद्यार्थी आहेत. जेव्हा या गँगने एका मोठ्या व्यवसायीकाच्या मुलीवर हात टाकला तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी गँगच्या लीडरसोबतच इतर 4 मुलांना अटक केले आहे.


  गँगच्या लीडरचे नाव आदर्श आग्रवाल आहे. पोलिसांनी सांगितले की, रायपूरमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यवसायीकाची 15 वर्षीय मुलगी 10वीत शिकते. अंदाजे 1 वर्षांपूर्वी फेसबूकवर तिची मैत्री एका 17 वर्षीय मुलासोबत झाली. आधी दोघांत फक्त बोलणे व्हायचे पण नंतर दोघे भेटू लागले.


  एक दिवशी मुलाने तिला आपले मित्र आदर्श आग्रवाल आणि सोहराबची भेट करून दिली. त्या दरम्यान आदर्शने मुलोसोबत मैत्री केली. काही दिवसानंतर आदर्शने सांगितले की, त्यांची ओळख करून देणाऱ्या मित्राला कँसर आहे आणि त्याच्या उपचारासाठी 5 लाख रूपयांयी गरज आहे, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीत.


  आदर्शने खुप इमोशनल पद्धतीने तिला हे सांगितले आणि तिला त्याच्यावर विश्वास बसला. तिला ही गोष्ट खुप मनाला लागली आणि तिने पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मुलीने आपल्या आईच्या खात्यातून 4 लाख रूपये काढले आणि आदर्शला दिले. पण काही दिवसानंतर तिला सगळे सत्यता कळाली.


  त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि मुलीने त्यांना भेटने बंद केले. तिने त्यांना बोलणे बंद केले होते पण मागच्या डिसेंबरला मुलांनी परत एकदा मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंत दोघांनी माफी मागितली आणि मुलीला मित्राच्या घरात घेऊन गेला आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवला.


  काही दिवसानंर मुलाने मुलीच्या वॉट्सअॅपवर तो व्हिडिओ पाठवला आणि तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. मुलीने त्यानं पैसे दिले आणि ते मुले काही दिवस शांत राहिले, पण 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी त्यांनी परत मुलीला पैसे मागितले आणि नाही दिलेस तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली.


  त्रस्त झालेल्या मुलीने 29 डिसेंबरला आपल्या आईचे दागिणे चोरले. त्यानंतर आरोपी तिला आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेले. बराच वेळ मुलीचा फोन लागला नाही म्हणून आईने तिच्या मैत्रिनींना विचारले.

  रात्री मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पण 30 डिसेंबरच्या रात्री अचानक मुलगी आपल्या घरी गेली तेव्हा पोलिसही तेथे आले. त्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले तेथे तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने सांगितले की, आरोपींनी तिच्याकडून 9 लाख रूपये आणि आईचे दागिणे घेतले.


  त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, आयटी अॅक्ट आणि पॉक्सो अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आदर्श आणि त्याच्या तीन सांथिदारांना अटक केले. पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त केले आणि तो अश्लील व्हिडिओ डिलीट केला.


  पोलिसांना तपासात कळाले की, ही मुलांची टोली फेसबूकवरून मुलींना फासतात आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करतात.

Trending