आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मुक्त होऊया या पाच आजारांपासून 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज असे काही करू या की, आपल्याला असणाऱ्या शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळायला हवी. येथे जाणून घेऊया अशा काही पद्धती ज्या गंभीर आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत करतील. 

1. तणावापासून बचाव करेल 
बह्म मुद्रा 
कोणत्याही सुखासनात जसे वज्रासन किंवा पद्मासनात कंबर सरळ ठेवत बसावे. दोन्ही हातांना दोन्ही गुडघ्यावर ठेवून खांद्यांना सैल सोडावे. मानेला हळूहळू डाव्या बाजूला न्या. मग पुन्हा काही सेकंद उजव्या बाजूला थांबून डाव्या बाजूला वळावे. त्यानंतर मानेला वरच्या बाजूला न्यावे. पुन्हा खालच्या बाजूला न्यावे. या पद्धतीने एक चक्र पूर्ण होते. आपल्या सुविधेनुसार याला चार ते पाच चक्रांमध्ये करू शकता. 

याचेे फायदे 
- मानेच्या मांसपेशी मजबूत व लवचिक बनवतात. 
- डोकेदुखी, सर्दी, खोकला यापासून बचाव करतो. 
- डोळ्यांचा अशक्तपणा दूर करतो. 
- चक्कर येण्याची समस्या दूर होते. 
- झाेप चांगली येण्यास मदत होते. 
- यामुळे ध्वनी संवेदनशीलता कमी होते. 
- तणाव व राग शांत करण्यास मदतशील 
- उदासीनता दूर करण्यात मदत करते. 
- यामुळे एकाग्रताही वाढते. 

10 मिनिटांपर्यंत ब्रह्ममुद्रेने सुरुवात करावी. हळूहळू याचा वेळ वाढवून अर्धा तास ते एक तासपर्यंत करू शकता. 

तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हा योग करा 
ब्रह्ममुद्रेचा अभ्यास करताना मेरुदंड पूर्णपणे सरळ ठेवा. ज्या गतीने आपण मानेला डाव्या किंवा उजव्या बाजूला घेऊन जातो त्याच गतीने हळूहळू परत आणा. हनुवटीला खांद्याकडे दाबावे. ज्यांना सर्वायकल स्पाँडिलायसिस किंवा थायरॉइड आहे त्यांनी हनुवटीला वरच्या बाजूला दाबावे. मानेला खालच्या बाजूला घेऊन जाताना खांदे वाकवू नये. कंबर, मान, खांदे सरळ ठेवावे. मानेत किंवा गळ्यात काही गंभीर समस्या असल्यास योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा योग करावा. 

विद्यार्थ्यांसाठी खास 
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हे आसन विशेष लाभदायक असते. यामुळे अभ्यासाचा थकवा आणि डोळ्यांचा अशक्तपणा दूर होतो. सध्याच्या स्थितीत विद्यार्थी व विद्यार्थिनी स्पर्धांवर आपला वेळ देतात व लक्ष केंद्रित करतात. अशामध्ये योग त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. 

बातम्या आणखी आहेत...