आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Brahmastra' Will Be Released In 5 Languages On December 4, Alia Shared The Video Of The Announcement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 डिसेंबरला 5 भाषांमध्ये रिलीज होईल 'ब्रह्मास्त्र', आलियाने शेअर केला अनाउंसमेंटचा व्हिडिओ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात बनत असलेला सुपरहीरो चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची रिलीज डेट शेवटी फायनल झाली आहे. करण जोहरने एक फोटो शेअर करून रिलीजची तारीख अनाऊन्स केली. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरी आलिया भट्‌ट, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हातात एक पाटीदेखील आहे, ज्यामध्ये 4 डिसेंबर 2020 लिहिले आहे.   

आलियानेदेखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर, अमिताभ आणि अयान 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीज डेटबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. मात्र आलिया स्वतः तो व्हिडिओ बनवत होती.  

चित्रपटात नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉयदेखील दिसणार आहेत. चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होईल. बिग बींनी एक ट्वीट करून डायरेक्टर अयानसाठी लिहिले आयचे, आता त्यालाही ही डेट बदलण्याची परवानगी नाहीये. 'ब्रह्मास्त्रचे अंदाजे बजेट 150 कोटी आहे आणि हा इंडियन सिनेमातीळ पहिला प्लान्ड ट्रायोलॉजी आहे.