चुकूनही करू नयेत ही कामे, अन्यथा धनकुबेर व्यक्तीलाही येऊ शकते दारिद्र्य

चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत

रिलिजन डेस्क

Mar 29,2020 10:54:19 AM IST

चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली काही खास कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो.


या वस्तू जमिनीवर ठेवू नयेत...

1.दिवा, 2.शिवलिंग, 3.शाळीग्राम, 4.देवतांच्या मूर्ती, 5.यज्ञोपवीत, 6.सोनं आणि 7.शंख, 8.मणी या वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.


कुलदैवतेचे ध्यान

स्त्री असो किंवा पुरुष, सकाळी उठताच कुलदैवतेचे ध्यान करत दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर स्नान न करता जास्त वेळ तसेच राहू नये. रात्री परिधान केलेल्या कपड्यांचा लवकर त्याग करावा.


या तिथींना लक्षात ठेवा या गोष्टी...

हिंदू पंचांगानुसार कोणत्याही महिन्यातील अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला स्त्री संग, तेल मालिश आणि मांसाहार करू नये.


यांचा करू नये अनादर -

आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आई-वडील, मुलगा, मुलगी, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरु, अनाथ स्त्री, बहिण, भाऊ, देवी-देवता आणि ज्ञानी लोकांचा अनादर करू नये. यांचा अनादर केल्यास व्यक्ती धनकुबेर असला तरी त्याला खजिना रिक्त (रिकामा) होतो. या लोकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा लक्ष्मी लगेच त्याग करते.


रविवारी लक्षात ठेवा या गोष्टी -

रविवारी काशाच्या भांड्यात अन्न खाऊ नये. या दिवशी मसुराची डाळ, अद्रक, लाल रंगाचे पदार्थही खाऊ नयेत.

X