Article 15 / आयुषमान खुराणाच्या 'आर्टिकल 15'ला ब्राह्मण आणि करनी सेनेचा विरोध; नागपूरात शो बंद पाडण्याचा प्रयत्न

उच्चवर्गांवर टीका केल्याचा संघटनांचा आरोप 
 

दिव्य मराठी वेब

Jun 28,2019 02:47:00 PM IST

नागपूर : अभिनेता आयुषमान खुराणाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आर्टिकल 15(Article 15)' शुक्रवारी 28 जुलै रोजी नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला नागपुरात प्रदर्शनादरम्यान ब्राह्मण आणि करणी सेनेनी विरोध केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी ब्राह्मण आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र खबरदारी घेत हा प्रयत्न हाणून पाडला.

संघटनांकडून देण्यात आला होता इशारा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित आर्टिकल 15 चित्रपटाला प्रदर्शनाआधीपासून करनी सेना आणि ब्राह्मण सेनेसारख्या संघटनांचा विरोध होता. चित्रपटातील कथा आणि संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास तो बंद पाडण्यात येईल असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला होता.

शुक्रवारी 28 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या संघटनांनी नागपूरातील बऱ्याच चित्रपटगृहात दाखल झाल्या. काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या . पण चित्रपटगृहाबाहेरील पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

सत्य घटनांवर आधारित आहे चित्रपट
भारतीय संविधानातील कलम 15 वर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात घडणाऱ्या सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आधारित आहे. मुलींवर सामुहिक अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्यात येतात. पण या प्रकरणात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सांगत सीबीआय हे प्रकरण दाबले. तसेच उच्चवर्गाकडून पोलिसांवर दबाव टाकत हे प्रकरण दडपल्याचे टीका देखील या चित्रपटात करण्यात आली आहे. अशी काहीशी चित्रपटाची कथा आहे.

चित्रपटाला समीक्षकांची पसंती
आयुषमानने या चित्रपटात एक आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यासोबत या चित्रपटात इशा तलवार, कुमूद मिश्रा, सयानी गुप्ता यांसारखे कलाकारही आहेत. तसेच हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस पडला असून त्यांनी याला तीने ते चार स्टार दिले आहेत.

X
COMMENT