आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलासा, ब्राह्मण महासंघाने विरोध मागे घेत पाठिंबा दर्शवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षाने त्यांना सर्वात सेफ असलेला पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण, तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून बाहेरील आयात उमेदवार दिल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्यांचा जोरदार विरोध केला होता. पण, आता ब्राह्मण महासंघाने आपला विरोध मागे घेत, चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दर्शवला आहे.ठिकठिकाणी झळकावले फलक
कोथरूड मतदार संघातून भाजपने मेघा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने मेधा कुलकर्णी यांचे समर्थक आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या लोकांनी त्यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. ब्राह्मण बहुल मतदारसंघात समाजाबाहेरील आणि आयात उमेदवार नको अशी भूमिका घेतली होती. पण, आता काही अटींवर ब्राह्मण महासंघाने आपला विरोध मागे घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...