आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदूज्वराचा कहर : मुझफ्फरपूरमध्ये आणखी 7 बालकांचा मृत्यू, नितीश यांच्यासमोर मूल दगावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे निष्पाप बालकांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. मंगळवारी आणखी ७  बालकांवर मृत्यू आेढवला. अशा प्रकारे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या १४३ झाली. १६ बालकांची प्रकृती गंभीर आहे. अॅक्यूट इन्सेफ्लायटिस सिंड्रोममुळे (एईएस) आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केला आहे. 


हा आजार जीवघेणा ठरू लागला आहे. घटनेच्या १८ दिवसांनंतर मंगळवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुझफ्फरपूरला भेट दिली. ते श्रीकृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले व त्यांनी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. यादरम्यान नितीशकुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.


‘नितीशकुमार मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजीही झाली. नितीश एसकेएमसीएचला येण्यापूर्वी आणखी तीन बालकांचे प्राण गेले होते. त्यांच्या उपस्थितीत एका बालकाचे प्राण गेले. सध्या रुग्णालयात १७९ बालकांवर उपचार होत आहेत. त्यात मंगळवारी आणखी २८ मुलांना भरती करण्यात आले. नितीश यांनी एसकेएमसीएची क्षमता वाढवून ती २५०० खाटांची करण्याचे निर्देश दिले.


रुग्णालयात अत्यावश्यक साधनांची कमतरता : अधीक्षकांनी दिली कबुली
एसकेएमसीएचे अधीक्षक सुनील कुमार शाही म्हणाले, रुग्णालयात सध्या क्षमतेपेक्षा जास्त काम केले जात आहे. एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवले जात आहे. परंतु आम्ही सातत्याने त्यांच्यावर उपचार करत आहोत. रुग्णालयात पायाभूत गोष्टींची कमतरता आहे. खाटांची संख्या कमी आहे. सरकारने त्याची दखल घ्यावी. एसकेएमसीएचमध्ये आतापर्यंत ८९ व केजरीवाल रुग्णालयात १९ मुलांचा मृत्यू झाला.


आरोग्य विभागाने १०० कोटी रुपये खर्च, लसीकरण टाळले, आता पावसाची प्रतीक्षा
बिहारच्या आरोग्य विभागाचे परिस्थिती वाईट आहे. मेंदू ज्वराचा कहर कमी करण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. उष्णता वाढण्याबरोबरच मुझफ्फरपूरची स्थिती आणखीनच वाईट झाली आहे. खरे मेंदू ज्वर रोखण्यासाठी सरकारने संशोधन व उपचारावर आतापर्यंत १०० कोटी रुपये खर्च केले. परंतु लसीकरण मात्र केले नाही. दरवर्षी राज्यात हा आजार दिसून येतो.