आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वणवा विझवण्यासाठी सात देशांची 154 कोटींची मदत नाकारली; या पैशांतून युरोपच्या जंगलांचे संवर्धन करा, ब्राझीलने सुनावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलया । ब्राझीलच्या वर्षावनातील वणवा विझवण्यासाठी मदतीवरून ब्राझील व फ्रान्स यांच्यात जुंपली आहे. ब्राझीलने जी-७ देशांचा यासंबंधीचा प्रस्ताव मंगळवारी फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर फ्रान्सने आपला देश आणि ताब्यात असलेल्या बेटांची काळजी करावी, असा टाेला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बाेलसाेनाराेचे चीफ आॅफ स्टाफ आेनिक्स लाेरेंजाेनी यांनी लगावला आहे.     जी-७ देशांकडे असलेली पायाभूत साधने युराेपातील वणवे विझवण्यासाठी जास्त उपयाेगी आहेत, असे आम्हाला वाटते. इमॅन्युएल मॅक्राॅन यांना कॅथेड्रलचे आगीपासून संरक्षण करता आले नव्हते. ब्राझील एक लाेकशाहीवादी, स्वतंत्र राष्ट्र आहे. देशात कधीही भांडवलदारी व साम्राज्यवादी प्रथा जाेपासल्या गेल्या नाहीत. जी-७ ने ब्राझीलला मदतीच्या प्रस्तावांतर्गत १५४ काेटी रुपये व विमान देऊ केले आहेत.दुसरीकडे मॅक्रॉन यांनी पत्नीवरील अनावश्यक टिप्पणीबद्दल बोलसोनारो यांच्यावर टीका केली.    बोलसोनारो यांच्या समर्थकांनी फेसबुकवर मॅक्रॉन यांच्या ६६ वर्षीय पत्नी ब्रिजेट यांची खिल्ली उडवली होती. बोलसोनारो यांनी मॅक्रॉन यांच्या पत्नीचा संदर्भ देताना ‘मॅक्रॉन का अन्याय करतात, हे तुम्हाला समजले असेल’, असे म्हटले होते. त्यावर मॅक्रॉन म्हणाले, हा अभद्र विनोद आहे. 

बोलिव्हियाचे ४ हजार सैनिक जंगलात रवाना
बोलिव्हियाचे ९ हजार ५०० चौरस किमी क्षेत्रफळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बोलिव्हियाने ४ हजार सैनिक जंगलात वणवा विझवण्यासाठी पाठवले आहेत. आगीमुळे सुमारे २६०० चौ.किमी क्षेत्रफळातील तुकाबाका वन्यप्राणी अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. ब्राझीलने ४४ हजार जवानांना आग विझवण्यासाठी पाठवले होते. ब्राझीलच्या हवाई दलाने विमानाने पाण्याचे फवारे मारण्याचे काम सुरू केले होते. धुरामुळे ब्राझीलच्या पोर्टो वेल्हो शहरातील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.