आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉन आगीवर नियंत्रणासाठी ब्राझीलने सैन्य पाठवले; ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह १० देशांत निदर्शने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणवा विझवण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले होते. - Divya Marathi
वणवा विझवण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले होते.

ब्रासिलिया/ब्युनस आयर्स - ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी अॅमेझॉन जंगलातील आग विझवण्यासाठी सैनिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. व्हेनेझुएला सरकारने अमेझॉनियन देशांना आगीसंदर्भात लवकर चर्चा करण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे या प्रकरणी ब्रिटन, जर्मनी व फ्रान्ससह १० देशांत निदर्शने करण्यात आली. 

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांनी सीमा, आदिवासी आणि संरक्षित भागामध्ये सैनिकांची तैनाती करण्याचे आदेश दिले आहे. ही घोषणा त्यांनी युरोपीय नेत्यांच्या दबावानंतर केली आहे. पर्यारण रक्षकांनी आग विझवण्यासाठी शुक्रवारी ब्राझीलसह लंडन, बर्लिन, मुंबई आणि पॅरिस या शहरांमध्ये ब्राझीलच्या दूतावासासमोर निषेध नोंदवला आहे. अॅमेझॉन येथील आग गेल्या तीन आठवड्यांपासून वाढत आहे. ब्राझीलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्चने दिलेल्या सॅटेलािटच्या आकडेवारीनुसार यावर्षी २०१८ च्या तुलनेत ही ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
 
> ब्राझील व बोलिव्हियानंतर आग पॅराग्वेपर्यंत पसरली. गेल्या ४८ तासांत २५०० ठिकाणे खाक. 
> आठ दिवसांत आग १३ हजार चौरस किमी पर्यंत पसरली. त्यात बोलिव्हियाचे ८ हजार चौ.किमी क्षेत्र.  
 

सालो पाओलोत रस्त्यावर लोक उतरले
वणव्यामुळे ब्राझीलच्या साओपाओलो शहरात अंधार पसरला आहे. वणवा विझवण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले होते.