दूध पिताना अचानक थांबला 21 दिवसांच्या बाळाचा श्वास, शरीर पडले निळे, दोन पोलिस अधिकाऱ्यांनी वाचवले प्राण...


दोन पोलिस अधिकाऱ्यांनी तोंडाने श्वास देऊन वाचवले बाळाचे प्राण

दिव्य मराठी

Apr 23,2019 04:49:00 PM IST

ब्राझील- ब्राझीलच्या मारिलिया भागात दोन पोलिस अधिकाऱ्यानी आपल्या हूशारीने 21 दिवसांच्या नवजात बाळाचे प्राण वाचवले आहेत. बाळाला त्याचे नातेवाईक बेशुद्ध अवस्थेमध्ये सैफ पाऊलो परिसरातील पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले, त्यावेळेस बाळ श्वास घेत नव्हते. त्याचे शरीर निळे पडले होते. पण त्याचवेळेस पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या दोन अधिकाऱ्यानी तोंडाने श्वास देऊन बाळाचे प्राण वाचवले. ही संपुर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली, आता हा व्हिडिओ जगभर व्हायरल होत आहे.


ही घटना 15 एप्रिल रोजी घडली, या घटनेचे फूटेज नुकतेच समोर आले आहे. बाळाचा श्वास थांबल्यामुळे त्याला पोलिस स्टेशममध्ये घेऊन आलेल्या नातेवाईकांनी सांगितले की, दूध पिल्यानंतर बाळाला श्वास घेता येत नव्हता. यानंतर मिल्ट्री पोलिस बटालियनच्या हेडक्वार्टरमध्ये उपस्थित असलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी बाळाला सीपीआर आणि तोंडाने श्वास दिला.


पोलिसांच्या प्रयत्नानंतर बाळाच्या श्वासनळीत जमा झालेले दुध बाहेर आले आणि बाळाच्या शरीराचा रंग नॉर्मल झाला. ही घटना पोलिस स्टेशनच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ पोलिस विभाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दोन्ही जीगरबाज अधिकाऱ्यांना हिरो म्हणत आहेत. जेव्हा पोलिस बाळाचे प्राण वाचवत होते तेव्हा बाळाच्या आईला रडू कोसळले. घटनेनंतर दांमत्याने रूग्नालयात बाळाची तपासणी केली, तेथे डॉक्टरांनी बाळाला स्वस्थ असल्याचे सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज...

X