आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनोस - ब्राझीलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील तरुणीचे लोक तोंडभर कौतुक करत आहेत. ती आपल्या घराबाहेर एकटीच फिरत होती. त्याचवेळी एका चोरट्याने गैरफायदा घेत तिच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. हीच चूक त्याला महागात पडली. ती तरुणी प्रत्यक्षात एक मार्शल आर्टिस्ट होती. मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करताच तिने चोरट्याला आपल्या पायांमध्ये असे पकडले की तो रडत-रडत दयेची भीक मागत होता. भर रस्त्यावर झालेल्या या घटनेचा काहींनी व्हिडिओ शूट केला. यानंतर चोरट्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही घटना ब्राझीलच्या मनोस येथे मंगळवारी घडली. 22 वर्षांची सबरीना लीट्स आपल्या घराबाहेर टेहळणीसाठी निघाली होती. हातात मोबाईल घेऊन फिरताना अचानक तिचा चोरट्याशी सामना झाला. त्या ठिकाणी एकूणच दोन चोरटे होते आणि दोघेही एका बाइकवर आले होते. पहिल्या नजरेतच सबरीनाला त्यांच्याकडे शस्त्र नसल्याची खात्री पटली. दुसऱ्याच क्षणी तिने त्यापैकी एकाला हाणून पाडले आणि पायांमध्ये असे अडकवले की त्याचा जीव गुदमरायला लागला. सबरीना गेल्या 4 वर्षांपासून प्रोफेशनल मार्शल आर्ट्स ट्रेनिंग घेत होती याची चोरट्यांनी कल्पनाही केली नसावी. तिने चोरट्याला इतके वाइट पकडले होते की त्याला मृत्यू अटळ वाटत होता. कुठल्याही परिस्थितीत तिच्या ग्रिपमधून सुटण्यासाठी तो दयेची भीक मागत होता. मोठ-मोठ्याने रडून असे पुन्हा कधीच करणार नसल्याचे बोलत होता. आत्मरक्षणाची कला शिकलेली तरुणी जगभरातील महिलांसाठी एक आदर्श ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.