आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापड विक्रेत्याचे घर फोडून,2.50 लाखांचा ऐवज लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून धूत रुग्णालयासमोरील म्हाडा कॉलनीत भरदिवसा कापड विक्रेत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. १४ नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला. नितीन रामदास वाल्हेकर (२६, रा. म्हाडा कॉलनी) यांचे रामनगर येथे कपड्यांचे दुकान आहे.

 

१४ नोव्हेंबर रोजी त्यांची आई व पत्नी घराला कुलूप लावून दुपारी तीन वाजता दुकानात गेल्या. रात्री साडेआठ वाजता त्या घरी परतल्या. तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त होते. त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी वाल्हेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुरलीधर सांगळे तपास करत आहेत. 


गजबजलेला परिसर 
चोरट्यांनी हातोड्याने कुलूप तोडले. दुपारी तीन ते सायंकाळी साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. घरासमोर मारुतीचे मंदिर आहे. या ठिकाणी नेहमीच भाविकांची ये-जा असते. तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


दिवाळीच्या पूजेसाठी ठेवले होते ७० हजार रुपये 
बेडरूमच्या कपाटाचे कुलूप तोडून चोरांनी दिवाळीच्या पूजेसाठी आणलेले रोख ७० हजार रुपये तसेच सोन्याचे एक लॉकेट, तीन तोळ्यांचे नेकलेस, दीड तोळ्याचे झुमके, अंगठ्या व सोन्याचे कडे चोरून नेले

बातम्या आणखी आहेत...