आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 लोकांनी डोंगर फोडून 45 दिवसांत केला रस्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैतुल  - मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील भंडारपानी गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे. हे गाव १८०० फूट उंच डोंगरावर वसलेले आहे. गावात एका झोपडीत शाळा भरते. ती फक्त ५ वीपर्यंतच आहे. यामुळे पुढील शिक्षणासाठी मुलांना दुसऱ्या गावी जावे लागते. परंतु तेथे जाण्यासाठी त्यांना ३ तास लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी गावातील २० लोकांनी ४५ दिवस श्रमदान करून डोंगर फोडला आणि ३ किमी लांबीचा रस्ता तयार केला. आता मुले फक्त ३० मिनिटांत शाळेला जाऊ लागले आहेत. हे गाव १९ वर्षांपूर्वी डोंगरावर वसलेले असल्याने येथे सुविधा मिळालेल्या नाहीत.  


५८ मुले शिकत आहेत. त्यांना दोन शिक्षक शिकवतात. सरकारी कागदोपत्री शाळेला इमारतीची मंजुरी मिळालेली आहे. पण डोंगरावर बांधकामाचे साहित्य नेता येत नसल्याने येथील कुपाट्या वापरून झोपडी तयार केलेली आहे.


डोंगरावर आदिवासी वस्ती  
घोडाडाेंगरी भागातील तहसीलदार सत्यनारायण सोनी यांनी सांगितले, ही आदिवासी लोकांची वस्ती आहे. त्यांना गावात कोठे जाऊन राहण्याची इच्छा असेल तर राहण्याची सोय करता येईल. तर गावकरी सांगतात,  मुलांना आजवर ५ वीच्या पुढे शिकवणे शक्य नव्हते. इमलीखेडा गावी जाण्यासाठी सगळा डोंगराळ भाग होता. तेथे वन्य प्राण्यांची भीती असायची. त्यामुळे अन्यत्र वस्ती करण्याचा विचार करत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...