आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काहीच सुधारणा दिसत नव्हती. त्यामुळे, डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. यानंतर शनिवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. देश सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या दुखातून सावरला नाही. त्यातच जेटलींना या जगाचा निरोेप घेतला. जेटलींच्या निधनाने राजकीय वर्तुळासह देशभर शोककळा पसरली आहे.

त्यांनी देशाला आर्थिक बळकटी दिली, मी एक सच्चा मित्र गमावला -मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, "अरुण जेटली एक महान राजकीय नेते होते. बुद्धीजीवि तसेच कायद्याचे पंडित होते. मी जेटलींच्या पत्नी आणि मुलगा रोहन यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले. अरुण जेटली विनोद आणि गांभीर्याचे एक अनोखे संगम होते. ते समाजातील प्रत्येक घटकाचे प्रिय होते. देशाला आर्थिक विकास, संरक्षणात बळकटी आणि कायदे निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. आणीबाणीत ते विद्यार्थी नेते म्हणून सक्रीय होते. त्यांच्या निधनाने मी एक अमूल्य मित्र गमावला. त्यांच्यासोबत राहून काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले. ते सदैव आमच्या मनांमध्ये राहतील. ओम शांति..."

9 ऑगस्टपासून एम्समध्ये घेत होते उपचार
श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाल्याने जेटलींना 9 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेटलींना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर होता. ते उपचारासाठी 13 जानेवारी रोजी न्यूयॉर्कला सुद्धा गेले होते. फेब्रुवारीतच ते उपचार करून भारतात परतले होते. जेटलींनी अमेरिकेत उपचार केल्यानंतर घरी आल्यानंतर किती खुश आहोत याबद्दल एक ट्वीट केले होते. त्यांनी एप्रिल 2018 पासूनच कामकाज बंद केले होते. 14 मे 2018 रोजी त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांना शुगर देखील होता. सप्टेंबर 2014 मध्ये वजन वाढल्याने जेटलींवर बॅरियाट्रिक सर्जरी सुद्धा करण्यात आली होती.

भाजपच्या विजयी जल्लोषातही होते अनुपस्थित
जेटलींवर 6 महिन्यांपूर्वी सुद्धा एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी ब्रिटन आणि अमेरिकेत जाण्याचा सल्ला दिला होता. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर ते भाजप कार्यालयात दिसलेच नव्हते. त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सुद्धा सहभाग घेतला नव्हता. मे 2019 मध्ये त्यांनी मोदींना सांगितले होते, की ते सरकारमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. यानंतर पीएम नरेंद्र मोदी जेटलींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते.

बातम्या आणखी आहेत...