आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breaking Bad: Two US Chemistry Professors Arrested For Making Meth At University News And Updates

विद्यापीठाच्या लॅबमध्येच बनवत होते ड्रग्स, रसायनशास्त्राच्या दोन प्राध्यापकांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेकिंग बॅड टीव्ही सिरीजचे मुख्य पात्र - Divya Marathi
ब्रेकिंग बॅड टीव्ही सिरीजचे मुख्य पात्र

वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका विद्यापीठात कार्यरत दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे. केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विभागात काम करणारे हे दोघे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतच प्रतिबंधित 'मेथेमफेटामीन' / मेथ (अमली पदार्थ) बनवत होते. ही घटना अमेरिकेच्या अरकंसास प्रांतातील हेंडर्सन विद्यापीठात समोर आली आहे. टेरी बेटमन (45) आणि ब्रॅडली रोलंड (40) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज 'ब्रेकिंग बॅड' मध्ये अशाच पद्धतीने एक प्राध्यापक मेथ बनवतो. सोशल मीडियावर या घटनेची तुलना त्या सिरीजशी केली जात आहे.

कॅम्पसमध्ये पसरलेल्या दुर्गंधीमुळे समोर आले प्रकरण

  • वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटमन आणि रोलंड विद्यापीठाच्या लॅबमध्येच मेथ आणि इतर अमली पदार्थ तयार करत होते. गेल्या महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक विचित्र केमिकलचा दुर्गंधी पसरली होता. विद्यापीठ परिसर पोलिस प्रमुखांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा 11 ऑक्टोबरपासून बेटमन आणि रोलंड तीन दिवसांच्या सुटीवर निघाले.
  • प्राथमिक तपासात ही दुर्गंधी बेन्झाईल क्लोराइड नावाच्या केमिकलची असल्याचे समोर आले. हे केमिकल प्रामुख्याने मेथ बनवण्यासाठी वापरले जाते. या तपासानंतर विद्यापीठाच्या विज्ञान विभागाची इमारत तात्पुरती बंद करून सफाईचे काम सुरू करण्यात आले. तसेच 29 ऑक्टोबर रोजी इमारत पुन्हा उघडण्यात आली.
  • याच दरम्यान झालेल्या चौकशीत बेटमन आणि रोलंड या दोघांना अटक करण्यात आली. तसेच शनिवारी क्लार्क काउंट स्थानिक न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले. बेटमन या विद्यापीठात गेल्या 10 वर्षांपासून काम करत होते. तर रोलंडने 2014 मध्ये विद्यापीठात कामाला सुरुवात केली. अमेरिकेतील कायद्यानुसार, मेथ किंवा अमली पदार्थ बनवणे हा गंभीर गुन्हा आहे. आरोप सिद्ध झाल्यास यात 40 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...