आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breaking News College Girl Brutally Killed In Front Of Police Station In Sivani MP

Shocking: दिवसाढवळ्या तो तरुणीला दगडाने ठेचत होता, Police तमाशा पाहत उभे होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिवनी (एमपी) - शहराच्या मधोमध असलेल्या पोलिस स्टेशनला खेटून नेताजी सुभाष गर्ल्स कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीची माथेफिरूने दिवसाढवळ्या दगडाने डोके ठेचून हत्या केली. कॉलेज कॅम्पसला लागून पोलिस स्टेशनची भिंत आहे, यामुळे हे हत्याकांड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावणारे ठरले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

असे आहे प्रकरण
सोमवारी सकाळी 11 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स कॉलेजमध्ये फुलाराहून कॉलेज विद्यार्थिनी रानू नागौत्रा (22) लखनावाड़ा परिसरात कॉलेजसाठी आली होती. बीएस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीच्या मागे-मागे तिच्याच गावातील एक माथेफिरू अनिल मिश्रा (38) ही आला होता. छेडछाडीची एक जुनी केस परत घेण्यासाठी अनिल विद्यार्थिनीवर दबाव टाकत होता. यावरूनच कोलेकर कॉलेजच्या कॅम्पसच्या जवळ दोघांत भांडण झाले. यानंतर अनिलने विद्यार्थिनीच्या डोक्यात 10-15 किलो वजनाचा एक दगड घातला. अनिल तिच्यावर दुसरा वार करणार तेवढ्यात तेथे उपस्थित आरक्षक वकील खान यांनी त्याला पकडले. विद्यार्थिनीला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

 

जुन्या वादामुळे झाली हत्या...
लखनवाडा पोलिसांत 15 फेब्रुवारी 2018 रोजी विद्यार्थिनीने अनिलविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर पोलिसांनी कलम 354, 354 डी, 506 आणि एससी, एसटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची पेशी 6 सप्टेंबर रोजी होणार होती. यामुळे केस परत घेण्यासाठी आरोपी विद्यार्थिनीवर दबाव टाकत होता.

 

काय म्हणतात पोलिस?
घटना अचानक घडलेली आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध आमचे अभियान सुरूच आहे. आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. निश्चितच कडक कारवाई होईल.

- विवेकराज सिंह, एसपी, सिवनी.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या खळबळजनक घटनेचे आणखी Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...