आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, उंचच उंच धुराच्या लोटांमुळे सर्वसामान्य भयभीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक छायाचित्र. - Divya Marathi
प्रतीकात्मक छायाचित्र.
मुंबई - भिवंडीच्या दापोडा परिसरातील पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग लागली असून उंचच उंच धुराचे लोट उठत आहेत. या गोदामात हायड्रोजन पेरॉक्साडसह इतर केमिकलचा साठा होता, यामुळे ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सदर गोदाम हे वेदांत ग्लोबल या कंपनीचे आहे.
तथापि, भिवंडीमध्ये गोदामात आगीच्या घटना वेळोवेळी समोर आलेल्या आहेत. आज लागलेल्या आगीत जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु प्रचंड धुरामुळे नागरिकांना मात्र श्वसनाचा त्रास होत आहे. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत.  

बातम्या आणखी आहेत...