आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीच्या मोंढा मार्केटमध्ये भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी (बीड) - परळी वैजनाथच्या मोंढा मार्केटमध्ये पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. एकूण 4 दुकानांत ही आग पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तथापि, दुकानातील चीजवस्तू जळून बेचिराख झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे बंब आग आटोक्यात आणण्यासाठी अद्यापही प्रयत्नरत आहेत.   

 

बातम्या आणखी आहेत...