आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीला लागलेली भीषण आग आटोक्यात, 70 झोपड्या खाक..3 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वांद्रे पश्चिममधील निर्मल झोपडपट्टीला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात आली. आगीत 70 झोपड्या जळून खाक झाल्या असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

निर्मल झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. आठ ते दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. लेव्हल 4 ची आग असल्याने अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुरु आहे.

 

निर्मल झोपडपट्टी ही अतिशय दाट वस्ती असल्याने आग पसरत गेली. दाट वस्ती असल्यानेही आग विझविण्यासाठी अग्निशमन जवानांना मोठ्या अडचणी आल्या.

#Visuals: Level-3 fire breaks out in a slum at Lalmati, opposite Bandra Fire Station on Nagardas Road. 9 Fire tenders at the spot. #Mumbai pic.twitter.com/awQZXWeu2y

— ANI (@ANI) October 30, 2018

 

गरीबनगर झोपडपट्टीला लागलेली ही आग लेव्हल 3ची असून वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. दाट वस्ती आणि अरुंद गल्ल्यांमुळे आग विझविण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहेत. धुराचे प्रचंड लोट लांबूनही दिसत आहेत. तथापि, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Avoid off ramp near Bandra Reclamation, big fire looks like originated from the shanty under the bridge. #mumbai #bandra pic.twitter.com/w0FB5o56bm

— Mike Melli (@mikemelli) October 30, 2018

मंगळवारी सकाळी ही झोपडपट्टीत भीषण आग लागली. यापूर्वीही ऑक्टोबर 2017 मध्ये गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. तेव्हा भीषण आगीत शेकडो झोपड्या जळून बेचिराख झाल्या होत्या.

Mumbai: Level-3 fire breaks out in a slum at Lalmati, opposite Bandra Fire Station on Nagardas Road. 9 Fire tenders at the spot. #Maharashtra pic.twitter.com/yRKncX5MoC

— ANI (@ANI) October 30, 2018

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित काही Photos...

बातम्या आणखी आहेत...