आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breast Cancer Detecter In Just 15 Minutes, New Device Made By Geeta From Banglore

गीताने तयार केलेले उपकरण १५ मिनिटांत करते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दोन बहिणींच्या मृत्यूनंतर तयार केले उपकरण
  • ३० रुग्णालयांत २५ हजार महिलांची तपासणी

शिवानी चतुर्वेदी

बंगळुरू- अशातच आरोग्य मंत्रालयाच्या एका अहवालात देशात १ लाख महिलांमध्ये २६ ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असल्याचे म्हटले आहे. हा देशात सर्वात वेगाने वाढणारा कॅन्सर आहे. दुसरीकडे लेन्सेटच्या अहवालानुसार, भारतात ६० टक्के महिलांच्या कॅन्सरचे वेळेवर निदानच होत नाही. यामुळे केवळ ६६ टक्के महिलाच यातून वाचतात, तर विकसित देशांत अशा ९० टक्के महिला कॅन्सरशी दोन हात करून पुन्हा तंदुरुस्त होतात.


हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी बंगळुरू येथील एक आयटी प्रोफेशनल संघर्ष करत आहे. गीता मंजुनाथ यांचे स्टार्टअप “निरामई’ने एआय बेस्ड थर्मल सेन्सर उपकरण तयार केले असून यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचे अगदी पहिल्या टप्प्यातच निदान होऊ शकते.  वास्तविक गीता मंजुनाथ यांच्या कुटुंबात या कॅन्सरमुळे दोघींचा मृत्यू झाला होता. त्या सांगतात, काही वर्षांपूर्वी माझ्या दोन चुलत बहिणींचा वयाच्या तिशीतच या रोगामुळे मृत्यू झाला होता.


या कॅन्सरचे वेळेवर निदान झाले असते तर त्या वाचू शकल्या असत्या. यासाठी काहीतरी करावे, असे मनोमन वाटत होते. मी सहकाऱ्यांशी थर्मोग्राफीबद्दल चर्चा केली. इन्फ्रारेड इमेजच्या आधारे विश्लेषण करणारे हे तंत्रज्ञान आहे. मी एक छोटे संशोधक पथक तयार केले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने कॅन्सरचे लवकर निदान करू शकणारे उपकरण तयार केले. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले तेव्हा संशोधकांसोबत मी “निरामई’चा पाया रचला. 


शरीरात असलेल्या पाच एमएमपर्यंत छोट्या गाठीही हे उपकरण सक्षमपणे तपासू शकते
गीता सांगतात, सध्या देशात मेमोग्राफीने ब्रेस्ट कॅन्सर तपासला जातो. ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांसाठी ही पद्धत फार यशस्वी नाही. मात्र, थर्मल सेन्सर उपकरण छातीच्या वाढत-घटत्या तापमानावर लक्ष ठेवते, त्याचे फोटोही घेते. यासाठी १०-१५ मिनिटे लागतात. हे उपकरण ५ एमएमपेक्षा लहान गाठीही ओळखू शकते.